विशेष प्रतिनिधी
मुंबई : कालच्या शिवाजी पार्कच्या सभेत राहुल गांधींनी “शक्ती” नावाचे मिसाईल आपल्या पोतडीतून काढून मोदींच्या दिशेने डागले, पण मोदींनी ते ड्रायव्हर्ट करून राहुल गांधींच्याच दिशेने भिरकावले!! राहुल गांधींनी काल “इंडिया” आघाडीच्या महारॅलीत मोठी गर्जना करून करून ते लढायला आले, मोदींच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या “शक्ती”शी. पण मोदींनी ती “शक्ती” जोडली माता, भगिनी, कन्या आणि भारतमातेशी!! PM Modi directly targets rahul Gandhi over his derogatory remarks on “shakti”!!
राहुल गांधींनी काल शिवाजी पार्कवर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना हिंदू धर्मातल्या शक्तीचे उदाहरण देऊन “शक्ती”शी लढायची बात मारली. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तोच मुद्दा उचलून ती “शक्ती” आज देशातल्या माता – भगिनी, कन्यांशी आणि भारतमातेशी जोडून राहुल गांधींवर मात केली.
राहुल गांधींनी आपली लढाई नरेंद्र मोदी या व्यक्तीशी नसून त्याच्या पाठीमागे असणाऱ्या “शक्ती”शी आहे असे म्हटले होते. नरेंद्र मोदींच्या पाठीशी बडे बडे उद्योगपती उभे राहतात. त्यांना पैसा पुरवतात. ईडी, सीबीआय इन्कम टॅक्स डिपार्टमेंट या केंद्रीय संस्था मोदींची हत्यारे आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी हे “बलाढ्य” भासतात, पण प्रत्यक्षात ते “मुखवटा” आहेत. त्यांच्या मागे ही जी “शक्ती” उभी आहे, तिच्याशी आपल्याला लढायचे आहे, असे राहुल गांधी काल म्हणाले होते.
त्यावरूनच देशभर मोठा गदारोळ उठला. राहुल गांधींनी मोदींशी लढताना “शक्ती” हा शब्द प्रयोग वापरून हिंदू धर्माचा अपमान केला. ते उदयनिधी स्टालिनच्याच वळणावर गेले. उदयनिधी स्टालिन यांनी सनातन हिंदू धर्माचा अपमान केला, तसाच राहुल गांधींनी शक्तीचा अपमान केला, अशी टीकेची जोड सगळीकडून उठली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तेलंगणा मधल्या आजच्या सभेत नेमका तोच मुद्दा उचलला. राहुल गांधींचे थेट नाव घेऊन त्यांनी त्यांच्यावर “शक्ती” या मुद्द्यावरूनच हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी म्हणाले, काल “इंडिया” आघाडीच्या मुंबईतल्या शिवाजी पार्कच्या सभेत “शक्ती”चा उल्लेख केला. “शक्ती”शी लढाईच्या बाता मारल्या, पण मी खरा शक्तीचा उपासक आहे. देशातल्या माता – भगिनी ह्या माझ्यासाठी “शक्तीस्वरूप” आहेत. माझी भारतमाता माझ्यासाठी “शक्तीस्वरूप” आहे. त्या “शक्ती”चे रक्षण करण्यासाठी मी जीवाची बाजी लावेन. जे लोक शक्तीशी लढायच्या बाता मारतात, त्यांना तिच्याशी लढू द्या, पण मी शक्तीची आजन्म पूजा करत राहीन!!
राहुल गांधी काही बोलले आणि नरेंद्र मोदींनी तो मुद्दा उचलला नाही असे कधी घडलेच नाही. नेमके तेच “शक्ती” या मुद्द्यावरून देखील आज घडले. राहुल गांधींनी “शक्ती” नावाचे मिसाईल मोदींवर फेकले, पण मोदींनी ते डायव्हर्ट करून त्यांच्यावरच उलटवले!!
PM Modi directly targets rahul Gandhi over his derogatory remarks on shakti
महत्वाच्या बातम्या
- महादेव सट्टा ॲपप्रकरणी भूपेश बघेलांविरुद्ध FIR; छत्तीसगडच्या माजी मुख्यमंत्र्यांसह 21 आरोपी
- मोदी म्हणाले- काँग्रेस आघाडी वापरते आणि फेकून देते, इंडिया आघाडी त्यासाठीच!
- राहुल + उद्धवचे “हिंदुत्व” मंदिरांमधून बाळासाहेबांच्या स्मारकापर्यंत आले; पण सावरकरांवर बोलायची हिंमत नाही दाखवू शकले!!
- प्रकाश आंबेडकर आले राहुल गांधींच्या व्यासपीठावर; पण खात्री नाही महाराष्ट्रात एकत्र लढण्यावर!!