विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : गरीब युवा महिला आणि शेतकरी या माझ्यासाठी चारच जाती असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांच्या जातीचा राजकारणाला छेद देणारी रणनीती उघड केली.PM Modi destroying menace of casteist politics of opposition, by saying poor, youth, women and farmers are only four castes!!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सर्वसमावेशक हिंदुत्ववादी राजकारणाला शह देण्यासाठी काँग्रेस सह सर्व विरोधकांनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि देशांमध्ये संपूर्ण देशात जातनिहाय जनगणना हा मुद्दा लावून धरत हिंदू समाजात पुन्हा एकदा जाती – जातींमध्ये भेद करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी स्वतःची रणनीती आखत विरोधकांच्या जातीच्या राजकारणाला छेद दिला आहे.
भारत विकास संकल्प यात्रेच्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदींनी आपल्या नव्या रणनीतीचा स्पष्ट खुलासा केला. गरीब, युवा, महिला आणि शेतकरी यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा ऊहापोह त्यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले :
- या देशात लोकांनी हा पण मोठा कालखंड बघितला आहे, ज्यावेळी सरकारी स्वतःला जनतेचा मायबाप समजत असत म, पण सर्वसामान्य जनतेला साधारण सुविधांपासून देखील वंचित ठेवत असत. दलाली आणि लाचखोरी शिवाय छोटी छोटी कामे सुद्धा होत नसत.
- आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर दलाली काढून टाकली. त्यामुळे लाचखोरी आटोक्यात आली आणि जनतेला थेट लाभ देण्याची प्रणाली उभे केली त्यामुळे केंद्र सरकार पाठवत असलेल्या निधी थेट जनतेच्या खात्यात पोहोचतो मधल्या मध्ये तो खाल्ला जात नाही किंवा उडवला जात नाही.
- देशातले कुशासन संपून देशाचा सुशासनाच्या मार्गावर आहे, पण सुशासनाची माझी व्याख्या स्पष्ट आहे. 100% लाभ आणि 100 % लाभार्थी. देशातल्या प्रत्येक लाभार्थ्याला प्रत्येक लाभ हा 100 % पोहोचलाच पाहिजे. त्यात कोणताही भेदभाव होता कामा नये.
- माझ्यासाठी या देशात फक्त चारच जाती आहेत. गरीब युवा महिला आणि शेतकरी या चार जातींचे कल्याण हे आमच्या सरकारचे ध्येय आहे.
पंतप्रधान मोदींच्या या परखड वक्तव्यातून काँग्रेस सह सर्व विरोधकांनी सुरू केलेल्या जातीच्या राजकारणाला छेद गेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून खासदार राहुल गांधी, त्यांचे काँग्रेस मधले अनुयायी आणि बाकीचे विरोधी पक्ष वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि संपूर्ण देशात जातनिहाय जनगणनेचा मुद्दा लावून धरत आहेत. “जिसकी जितनी आबादी, उतनी उसकी हिस्सेदारी”, असा त्यांचा दावा आहे. पण या दाव्यातून काँग्रेस सह सर्व विरोधक पंतप्रधान मोदींच्या सर्वसमावेशक हिंदुत्ववादी राजकारणाला शह देत संपूर्ण देशात जातीवर्चस्वाचे राजकारण करू पाहत आहेत.
परंतु मोदींनी उघडपणे माझ्यासाठी देशात फक्त गरीब, युवा, महिला आणि शेतकरी या चारच जाती आहेत, असे सांगून भाजपची 2024 ची रणनीतीचा स्पष्ट केली आहे.
PM Modi destroying menace of casteist politics of opposition, by saying poor, youth, women and farmers are only four castes!!
महत्वाच्या बातम्या
- Madhya Pradesh Exit Poll : मध्य प्रदेशात कोणाचे सरकार? भाजपची कायम राहणार सत्ता! पाहा महानिकालाचा अंदाज
- Rajasthan Exit Poll : राजस्थानात भाजपची सत्ता, जवळपास सर्वच पोलमध्ये काँग्रेसची निराशा
- आता ‘या’ राज्यात पेपरफुटीप्रकरणी जन्मठेप आणि 10 कोटी रुपयांपर्यंत दंड!
- म्यानमारमधून मिझोराममध्ये पळून आलेल्या आणखी 30 सैनिकांना मायदेशी परत पाठवले