• Download App
    योगींच्या गोरखपूरमध्ये १०००० कोटींची विकासकामे; एम्स, खत कारखाना आणि मेडिकल रिसर्च सेंटरचे मोदींच्या हस्ते लोकार्पण |PM modi dedicated AIIMS, RMCL and fertilizer factory in Gorakhpur

    योगींच्या गोरखपूरमध्ये १०००० कोटींची विकासकामे; एम्स, खत कारखाना आणि मेडिकल रिसर्च सेंटरचे मोदींच्या हस्ते लोकार्पण

    वृत्तसंस्था

    गोरखपूर : उत्तर प्रदेशात काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्याप्रमाणेच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील विशेष मोहिमेवर गेले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर मध्ये ऑल इंडिया मेडिकल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस अर्थात एम्सचे त्यांनी उद्घाटन केले.PM modi dedicated AIIMS, RMCL and fertilizer factory in Gorakhpur

    त्याचबरोबर राघवदास मेडिकल कॉलेजच्या रिसर्च सेंटरचे उद्घाटन केले. गोरखपूरमध्ये गेल्या तीस वर्षांपासून बंद पडलेल्या खत कारखान्याचे लोकार्पण केले.या तीनही विकासकामांसाठी सुमारे 10 हजार कोटी रुपयांचा खर्च गेल्या चार वर्षात योगी सरकारने केला आहे.



    या तीनही विकासकामांचे भूमिपूजन आणि शिलान्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोरखपूरमध्ये करण्यात आले होते. आज त्यांच्याच हस्ते त्यांचे लोकार्पणही झाले.कोरोना सारख्या घातक विषाणू संदर्भात रक्ताची सॅम्पल यापूर्वी गोरखपुर मधून पुण्याच्या प्रयोग शाळेत पाठवायला लागायची.

    दरम्यानच्या काळात रुग्णाची हालत खूप खराब व्हायची अथवा तो मरण पावायचा. त्यामुळे राघवदास मेडिकल कॉलेजमध्येच प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आणि दीड वर्षात ही प्रयोगशाळा तयार झाली आहे. तिचे लोकार्पण मोदींच्या हस्ते झाले.

    गोरखपुर खत कारखाना तीस वर्षांपासून बंद होता. त्यामध्ये सरकारने भांडवल घालून सुरू केला आहे. येथे सुमारे पाच हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. गोरखपुरच्या एम्स रुग्णालयामुळे पूर्वांचलात एक मोठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाली आहे. मोठ्या आणि घातक आजारांसाठी आता जनतेला दिल्लीला धाव घ्यावी लागणार नाही, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले आहे.

    आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जसे उत्तर प्रदेशच्या मोहिमेवर होते, तशाच प्रियांका गांधी यादेखील राज्यामध्ये आहेत. त्यांनी लग्न होतं विधानसभा निवडणुकीसंदर्भात दोन विभागातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या, तर अखिलेश यादव आज मेरठ मध्ये राष्ट्रीय लोकदलाचे नेते जयंत चौधरी यांच्यासमवेत रॅली करत आहेत.

    PM modi dedicated AIIMS, RMCL and fertilizer factory in Gorakhpur

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!