इंदिरा गांधींनंतर देशातल्या जनतेची नाडी कोणी ओळखली असेल, तर ती मोदींनीच!!, हे दुसऱ्या तिसऱ्या कोणी नव्हे, तर दस्तूरखुद्द माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी लिहिले आहे!!, प्रणवदांसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मुत्सद्द्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी आपल्या डायरीमध्ये असे निरीक्षण नोंदविणे याला विशेष महत्त्व आहे.PM Modi could recognise pulse of the people after Indira Gandhi, wrote Pranab Mukherjee in his diaries!!
प्रणव मुखर्जींनी लिहिलेल्या 51 डायऱ्या आणि त्यांच्याशी झालेले व्यक्तिगत संभाषण यावर आधारित त्यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी एक पुस्तक लिहिले आहे. “प्रणव, माय फादर : अ डॉटर रिमेम्बर्स” असे या पुस्तकाचे नाव आहे. वर्तमानकालीन इतिहासावर एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुत्सद्दी नेमका काय विचार करत होते??, यावर या पुस्तकातून प्रकाश पडतो.
भारतीय राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या अनेक नेत्यांबद्दल प्रणव मुखर्जींनी आपल्या डायऱ्यांमध्ये वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी निरीक्षणे नोंदवली. त्याचे खुलासे शर्मिष्ठा मुखर्जींच्या पुस्तकातून केले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर प्रणव मुखर्जींची “पॉलिटिकल केमिस्ट्री” उत्तम होती. दोन्हीही नेते वेगवेगळ्या विचार प्रणालींचे अनुयायी. पण आपल्या विचार प्रणालींमधील भिन्नतेची या दोन्ही नेत्यांना प्रगल्भ जाणीव होती, तरी देखील दोघांमधले राजकीय आणि राजनैतिक संबंध उत्तम राहिले हे महत्वपूर्ण निरीक्षण शर्मिष्ठा मुखर्जींनी नोंदविले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ते गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रणव मुखर्जींशी संबंध आले. ते जेव्हा व्यक्तिगत पातळीवर प्रणव मुखर्जींना भेटत असत, तेव्हा त्यांच्या पायाला हात लावून मोदी नमस्कार करत असत. हे करून आपल्याला खूप समाधान वाटते, असे मोदी म्हणाले होते. याचे प्रणव मुखर्जींना नेहमी आश्चर्य वाटत असे. पण प्रणव मुखर्जी त्यांना तसा नमस्कार करू देत असत.
प्रणव मुखर्जी काँग्रेसी विचारधारेचे प्रतिनिधित्व करणारे नेते होते, तर मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक. पण दोन विचार प्रणालींमधले भिन्नत्व दोन्ही नेत्यांच्या वैयक्तिक संबंधांमध्ये कधी आड आले नाही.
राष्ट्रपती म्हणून आपली घटनात्मक जबाबदारी आणि अधिकार प्रणव मुखर्जींनी कायम जपले आणि त्याचवेळी सरकार आणि प्रशासन चालवण्याची जबाबदारी पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाची आहे, याची जाणीवही त्यांनी कायम प्रगल्भतेने राखली. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या विचार प्रणाली भिन्न असूनही दोघांमध्ये कधी मतभेदाचे प्रसंग उद्भवले नाहीत, असे निरीक्षण शर्मिष्ठा मुखर्जींनी नोंदविले.
इतकेच नाही, तर प्रणव मुखर्जी खऱ्या अर्थाने काँग्रेस ही उदारमतवादी विचार प्रणालीचे पालन करणारे नेते होते. याचे उदाहरण देताना शर्मिष्ठा मुखर्जींनी त्यांच्याच डायरीतल्या काही नोंदी उघडपणे लिहिल्या. संपूर्ण देशाने एका संघ प्रचारकाला पूर्ण बहुमत देऊन पंतप्रधानपदी निवडल्यानंतर त्याला विरोध करणारा मी कोण आहे??, असा सवाल प्रणवदांनी केला होता. लोकशाही स्वीकारलेल्या देशात भिन्न भिन्न विचार प्रणालींचे सरकार येणारच आणि त्यांनी समन्वय राखून काम केले पाहिजे, हे मत ते नुसते नोंदवून थांबले नाहीत, तर त्या प्रकारे त्यांनी कृती केली, असेही शर्मिष्ठा मुखर्जींनी पुस्तकात लिहिले आहे.
प्रणवदांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी नोंदविलेले अत्यंत महत्त्वपूर्ण निरीक्षण शर्मिष्ठांनी आपल्या पुस्तकात खुलेपणाने लिहिले आहे, ते म्हणजे प्रणवदा म्हणत असत, की दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींनंतर या देशातल्या जनतेची नाडी कोणी ओळखली असेल, तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आहेत. पंतप्रधान मोदींची देशाविषयी, देशातल्या समस्यांविषयी आणि देशाच्या सामर्थ्याविषयी असलेली जाण आणि जाणीव विलक्षण आहे. समस्येच्या मूळाशी जाऊन ती सोडविण्याची त्यांची हातोटी स्पृहणीय आहे, हे निरीक्षण प्रणवरांनी नोंदविले होते आणि ते शर्मिष्ठांनी आपल्या पुस्तकात खुलेपणाने लिहिले आहे.
प्रणवदांसारख्या उच्च बुद्धिमत्तेच्या, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मुत्सद्द्याने इंदिरा गांधींसारख्या पंतप्रधानांच्या गुणांची तुलना पंतप्रधान मोदींशी करणे याला आजच्या राजकीय पार्श्वभूमीवर विशेष महत्त्व आहेच, पण भिन्न विचार प्रणालीच्या एखाद्या नेत्या विषयी असे निरीक्षण नोंदविणे हे प्रणव मुखर्जी या खऱ्या उदारमतवादी नेत्याचे मोठेपण दर्शविते.
PM Modi could recognise pulse of the people after Indira Gandhi, wrote Pranab Mukherjee in his diaries!!
महत्वाच्या बातम्या
- नीरा देवघर सिंचन प्रकल्पाला केंद्र सरकारचे 3591.46 कोटी मंजूर; भोर, खंडाळा, फलटण, माळशिरस पट्ट्याला लाभ!!
- नरसिंह रावांशी मधूर संबंधांवर प्रणवदांच्या डायरीतून “प्रकाश” आणि गांधी परिवाराची अंधारी बाजू उघड!!
- फडणवीसांचा अजितदादांना दणका; सुप्रिया सुळेंना नवाब मलिक यांचा कळवळा!!
- ओडिशा आणि झारखंडमध्ये बौद्ध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेडवर आयकर विभागाचे छापे