PM Modi congratulates new Vietnamese PM : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिएतनामच्या कम्युनिस्ट पक्षाचे नेते फाम मिन्ह चिन यांच्याशी फोनवर बोलून पंतप्रधान झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान मोदी यांनी विश्वास व्यक्त केला की, त्यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली भारत-व्हिएतनाम सर्वसमावेशक रणनीतिक भागीदारी आणखी मजबूत होत राहील. यादरम्यान त्यांनी फाम मिन्ह चिन यांना भारतात येण्याचे आमंत्रणही दिल्याचे सांगितले जात आहे. PM Modi congratulates new Vietnamese PM, says co-operation will continue
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिएतनामच्या कम्युनिस्ट पक्षाचे नेते फाम मिन्ह चिन यांच्याशी फोनवर बोलून पंतप्रधान झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान मोदी यांनी विश्वास व्यक्त केला की, त्यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली भारत-व्हिएतनाम सर्वसमावेशक रणनीतिक भागीदारी आणखी मजबूत होत राहील. यादरम्यान त्यांनी फाम मिन्ह चिन यांना भारतात येण्याचे आमंत्रणही दिल्याचे सांगितले जात आहे.
याबाबत पीएम मोदी यांनी ट्वीट करून म्हटले की, व्हिएतनामचे पंतप्रधान एच.ई. फाम मिन्ह चिन यांच्याशी फोनवर बोललो. आमच्या सर्वसमावेशक रणनीतिक भागीदारीच्या सर्व बाबींचा आढावा घेतला, इंडो-पॅसिफिकसाठी आमच्या सामायिक दृष्टिकोनाचा पुनरुच्चार केला आणि यूएनएससीसह सहकार्य राखण्याचे मान्य केले.
कोरोनादरम्यान पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद
खुल्या, सर्वसमावेशक, शांतताप्रिय आणि नियमांवर आधारित हिंदी महासागराच्या क्षेत्राविषयी दोन्ही देशांची मते सारखी आहेत, या गोष्टीचे पंतप्रधान मोदींनी स्वागत केले आणि म्हणूनच भारत-व्हिएतनाम व्यापक रणनीतिक भागीदारी क्षेत्रीय स्थिरता, समृद्धी आणि विकासास चालना देऊ शकते. भारत आणि व्हिएतनाम हे दोघेही सध्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे सहकारी सदस्य आहेत, असेही पंतप्रधानांनी नमूद केले. कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेदरम्यान दिलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधानांनी व्हिएतनामच्या सरकारचे आणि जनतेचे आभार मानले.
यासह, दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शविली की दोन्ही देशांनी कोरोना महामारीविरुद्ध एकमेकांना पाठिंबा देण्यासाठी सल्लामसलत आणि सहकार्य सुरू ठेवले पाहिजे.
PM Modi congratulates new Vietnamese PM, says co-operation will continue
महत्त्वाच्या बातम्या
- न्यूझीलंडचा व्लॉगर कार्ल रॉक भारतात ब्लॅकलिस्ट, Visa नियमांच्या उल्लंघनाचा आरोप
- केजरीवाल सरकारने DTC बसेसच्या खरेदीत केला 3500 कोटींचा घोटाळा, भाजप आरोपांवर उपमुख्यमंत्री सिसोदिया म्हणाले- आश्चर्य वाटतंय!
- 36 लाख दूध उत्पादकांच्या ‘अमूल’ने केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या निर्मितीवर मानले आभार, आणखी एका सहकार क्रांतीचे केले स्वागत
- चीनचा नवा डाव : जेनेटिक इंजिनिअरिंगने सैनिकांना शक्तिशाली बनवत आहे ड्रॅगन, अमेरिकाही चिंतित
- दिल्लीमध्ये ध्वनी प्रदूषण केल्यास 1 लाखापर्यंत दंड, वाचा पूर्ण यादी, काय-काय केल्याने होऊ शकतो दंड!