वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पहलगाम खाल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाला पाकिस्तानला धडा शिकवायचे संपूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यांनी त्यांचे टार्गेट, वेळ आणि मोडस ऑपरेंडी ठरवावी. त्यासाठी त्यांना सर्व प्रकारचे कारवाईचे स्वातंत्र्य (operational freedom) दिले जाईल, अशा स्पष्ट शब्दांत मोदींनी भारतीय सैन्य दलांच्या तिन्ही प्रमुखांना आश्वासित केले.
भारतीय सैन्य दलाच्या सर्व प्रकारच्या क्षमतांवर 140 कोटी भारतीयांचा पूर्ण विश्वास आहे. सैन्य दलांनी बिनधास्तपणे मोकळेपणाने त्यांचे काम करावे, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी तिन्ही सैन्यदल प्रमुखांचा आत्मविश्वास वाढविला.
भारतीय सैन्य दलांच्या निर्णयांमध्ये अनेकदा राजकीय हस्तक्षेप व्हायचा. हा अनुभव भारतीय सैन्य दलाने किमान 60 वर्षे घेतला होता. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींकडून संपूर्ण operational freedom मिळाल्याने भारतीय सैन्य दलांचा आत्मविश्वास प्रचंड उंचावला आहे.
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी सात लोक कल्याण मार्ग या आपल्या निवासस्थानी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, सैन्य दलाच्या तिन्ही दलांचे प्रमुख जनरल अनिल चौहान, जनरल उपेंद्र द्विवेदी, ऍडमिरल दिनेश त्रिपाठी, एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांची बैठक घेतली या बैठकीत मोदींनी सर्वांकडून भारतीय सैन्य दलाच्या तयारीचे इनपुट घेतले. त्यानंतर या सर्वांना पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या कारवाईचे संपूर्ण स्वातंत्र्य (operational freedom) बहाल केले.
दहशतवाद पूर्ण निपटून काढण्यासाठी देशाने प्राधान्य दिले आहे. त्यात कुठलीही कुचराई होता कामा नये. दहशतवादाचा पूर्ण बिमोड करण्यासाठी सैन्य दलांनी त्यांची टार्गेट्स, वेळ आणि मोडस ऑपरेंडी ठरवावी. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सैन्य दलांना पूर्णपणे मोकळीक आहे. त्यामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप होणार नाही, असे आश्वासन मोदींनी दिले.