वृत्तसंस्था
मॉस्को : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर दबाव आणून तुम्ही त्यांना भारताच्या हिताविरुद्ध निर्णय घ्यायला भाग पाडू शकत नाही, अशा स्पष्ट शब्दांमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्व गुणांविषयी ग्वाही दिली आहे. त्याचवेळी त्यांनी भारत – रशिया संबंध दृढ करण्यासाठी मोदींची गॅरंटी असल्याचा निर्वाळा पुतिन यांनी दिला. रशिया कॉलिंगच्या इन्व्हेस्टमेंट मीट मध्ये पुतिन बोलत होते. pm modi cannot be threated to take any decision against Indian people
भारतात मोदींची गॅरंटी हा शब्द गाजत असताना रशियातून अध्यक्ष पुतिन यांनी देखील मोदींच्या गॅरंटीचा हवाला दिल्याने मोदी गॅरंटीचा विस्तार संपूर्ण जगासमोर आला आहे.
पुतीन म्हणाले, की मी याची कल्पना देखील करू शकत नाही, की कोणी मोदींना भारताच्या आणि भारतीय जनतेच्या हिताविरोधात कोणता एखादा निर्णय घ्यायला कोणी धमकी देऊ शकेल अथवा भाग पाडू शकेल, अर्थात मी आणि ते या विषयावर कधी बोललो नाही, पण मोदी स्वतंत्रपणे आणि स्वतंत्र स्वयंप्रज्ञेने निर्णय घेतात. देशात कर्तव्य कठोर राहून त्या निर्णयांची अंमलबजावणी करतात, त्यामुळे मी देखील कधीकधी आश्चर्यचकित होतो.
भारत आणि रशिया यांच्यात विविध क्षेत्रात सहकार्य आणि सौहार्द निर्माण झाले. व्यापार वाढला, या सगळ्याला सध्या मोदींची गॅरंटी आहे. गेल्या वर्षी भारत आणि रशिया यांच्यातला व्यापार 35 अब्ज डॉलर्सचा होता, पण यावर्षी पहिल्या सहा महिने मध्येच हा व्यापार 33.5 अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचला. उरलेले सहा महिने अजून जायचे आहेत. पण त्यावेळी देखील व्यापारात वाढच झाल्याचे पाहायला मिळेल, अशी ग्वाही पुतिन यांनी दिली. भारत वेगाने विकसित होणारे अर्थव्यवस्था आहे तो वेग देखील संपूर्ण जगाला चकित करणार आहे, याकडे पुतिन यांनी आवर्जून लक्ष वेधले.
pm modi cannot be threated to take any decision against Indian people
महत्वाच्या बातम्या
- नीरा देवघर सिंचन प्रकल्पाला केंद्र सरकारचे 3591.46 कोटी मंजूर; भोर, खंडाळा, फलटण, माळशिरस पट्ट्याला लाभ!!
- नरसिंह रावांशी मधूर संबंधांवर प्रणवदांच्या डायरीतून “प्रकाश” आणि गांधी परिवाराची अंधारी बाजू उघड!!
- फडणवीसांचा अजितदादांना दणका; सुप्रिया सुळेंना नवाब मलिक यांचा कळवळा!!
- ओडिशा आणि झारखंडमध्ये बौद्ध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेडवर आयकर विभागाचे छापे