• Download App
    PM Modi नेहरूंनी आधी देशाचे, मग पाण्याचेही विभाजन केले, NDAच्या बैठकीत पीएम मोदींचा हल्लाबोल

    नेहरूंनी आधी देशाचे, मग पाण्याचेही विभाजन केले, NDAच्या बैठकीत पीएम मोदींचा हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिल्लीमध्ये झालेल्या एनडीए (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) संसदीय दलाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून मोठे विधान केले. या बैठकीत NDAच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांचा औपचारिक परिचय करून देण्यात आला.

    मोदींनी राधाकृष्णन यांचा उल्लेख करताना म्हटले की ते आयुष्यभर लोकसेवेत राहिले, दलित-ओबीसी समाजाच्या प्रगतीसाठी काम केले आणि समाजात चांगली छाप निर्माण केली. त्यांचा अनुभव आणि कामगिरी देशाला समृद्ध करणार असल्याचा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

    यावेळी मोदींनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंवरही टीका केली. ते म्हणाले, “नेहरूंनी आधी देशाचे विभाजन केले आणि नंतर सिंधू जल करार करून पाण्याचेही विभाजन केले. हा करार शेतकऱ्यांच्या विरोधात होता आणि देशाच्या हिताला धक्का देणारा होता.”

    एक दिवस आधीच NDAने राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदासाठी अधिकृत उमेदवारी जाहीर केली होती. राधाकृष्णन यांनीही हा विश्वास दाखवल्याबद्दल पीएम मोदी आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. ते म्हणाले की, ते आयुष्यभर देशासाठी कार्य करत राहतील.



    या बैठकीत…

    मोदींनी नेहरूंच्या धोरणांवर थेट हल्ला करून राजकीय संदेश दिला.

    तसेच राधाकृष्णन यांच्या उमेदवारीमुळे NDAने ओबीसी समाज आणि दक्षिण भारतातील राज्य तामिळनाडूसोबतचा राजकीय संबंध अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे.

    सीपी राधाकृष्णन २१ ऑगस्ट रोजी उमेदवारी अर्ज दाखल करतील

    एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार राधाकृष्णन २१ ऑगस्ट रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. यावेळी एनडीए शासित राज्यांचे सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील उपस्थित राहतील.

    उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ९ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी मतमोजणीही होईल. नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट आहे. २५ ऑगस्टपर्यंत नामांकन मागे घेता येईल.

    खरं तर, माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी २१ जुलैच्या रात्री अचानक पदाचा राजीनामा दिला. ७४ वर्षीय धनखड यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट २०२७ पर्यंत होता.

    नड्डा म्हणाले- बिनविरोध निवडणुकीसाठी विरोधी पक्षांशी बोलणार

    भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी रविवारी सांगितले की, ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सीपी राधाकृष्णन यांना बिनविरोध निवडून देण्यासाठी त्यांचा पक्ष विरोधी पक्षांशी चर्चा करेल. नड्डा म्हणाले की, एकमत निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आम्ही विरोधी पक्षांशीही चर्चा करू, जेणेकरून एकत्रितपणे आपण उपराष्ट्रपतीपदासाठी बिनविरोध निवडणूक सुनिश्चित करू शकू.

    नड्डा म्हणाले, ‘आम्ही आधीही सांगितले होते की आम्ही त्यांच्या (विरोधी पक्षाच्या) संपर्कात आहोत आणि आमच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला आहे आणि भविष्यातही आम्ही त्यांच्या संपर्कात राहू. सर्व एनडीए मित्रपक्षांनी सीपी राधाकृष्णन यांच्या नावाने आम्हाला पाठिंबा दिला आहे.

    PM Modi Attacks Nehru for Partitioning Country Water

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    INDI alliance ची रणनीती; लढायला अण्णा आणि निवृत्ती न्यायमूर्ती; पंतप्रधान बनणार मात्र राहुल गांधी!!

    INDI आघाडीतल्या नेत्यांना पराभवाची भीती; म्हणून सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्तींच्या गळ्यात घातली उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी!!

    Lok Sabha : लोकसभेत अंतराळवीर शुभांशू शुक्लांवर विशेष चर्चा; जितेंद्र सिंह म्हणाले- देश अंतराळ मोहिमेचे यश साजरे करत आहे, विरोधकांची नारेबाजी