वृतसंस्था
अल्मोडा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसवर एकापाठोपाठ एक वार करण्याचा सिलसिला आजही पुढे सुरू ठेवला आहे. उत्तराखंडात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अल्मोडा येथे बोलताना पंतप्रधान मोदींनी निवडणुकीची नवी घोषणा दिली. काँग्रेसची ही आत्तापर्यंत रणनीती राहिली आहे, “सब में डालो फूट, मिलकर करो लूट!!”, हाच काँग्रेसचा नारा राहिला आहे, अशा शब्दात मोदींनी त्या पक्षावर हल्ला चढवला.PM Modi attacks Congress again in Uttarakhand
भाजपच्या सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास या घोषणेची त्यांनी आठवण करून दिली.
काँग्रेसने आपल्या राजवटीत गरिबांसाठी योजनांच्या घोषणा मोठमोठ्या केल्या, पण प्रत्यक्षात दलित, वंचित, गरीब, पीडितांपर्यंत त्या खऱ्या अर्थाने पोचल्याच नाहीत. मधल्या मध्ये त्यांच्या दलालांनी या योजनांचे गैरफायदे उपटले, असा आरोप मोदींनी केला.
काँग्रेस पक्षाच्या अवस्थेविषयी बोलताना मोदी म्हणाले, की सध्या काँग्रेस पक्षाची दोन बहीण-भावंडे उत्तराखंडात फिरताहेत. त्यांना उत्तराखंडाच्या संस्कृतीची अजिबात माहिती नाही. जनरल बिपिन रावत यांच्यासारख्या सर्वोच्च सैनिकाला ते आधी शिव्या घालत होते. आता ते “स्पिरीट ऑफ उत्तराखंड” अशी भाषा वापरत आहेत. पण या बहीण भावा बरोबर कोणताही काँग्रेसचा नेता उत्तराखंडात फिरकायला तयार नाही. गेल्या 60 – 70 वर्षामध्ये काँग्रेसने अनेक मोठमोठे नेते दिले. केंद्रीय मंत्री, राज्यपाल दिले. पण त्यांच्यापैकी कोणीच या बहीण भावांबरोबर प्रचारात का दिसत नाही? कारण त्यांना स्वतःचा पक्ष वाचवायचा नाही, तर परिवार वाचवायचा आहे. म्हणून ते उत्तराखंडात फिरत आहेत, असा प्रखर हल्लाबोल पंतप्रधान मोदींनी केला.
– सत्तेवर असली की भ्रष्टाचार आणि विरोधात बसली की षड्यंत्र हीच काँग्रेसची ओळख
कालच उत्तराखंडातील श्रीनगरमध्ये मोदींनी काँग्रेसवर वेगळा हल्लाबोल केला होता काँग्रेस सत्तेवर असली की भ्रष्टाचार आणि विरोधात बसली की षड्यंत्र हीच त्या पक्षाची ओळख आहे, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, की सत्तेवर असली की बेलगाम भ्रष्टाचार आणि विरोधात केली की पूर्ण ताकतीनिशी देशा विरोधात षड्यंत्र करणे हीच काँग्रेसची धारणा आणि ओळख आहे. सत्ता असली की काँग्रेस नेते वाटेल तिथे आणि वाटेल तसा पैसा खातात आणि सत्ता गेली की कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात आंदोलन करण्यापेक्षा ते देश विरोधातच आंदोलनात उतरतात. वेगवेगळ्या मार्गाने षड्यंत्र करत राहतात. भ्रष्टाचार आणि षड्यंत्र हीच त्या पक्षाची ओळख बनली आहे.
उत्तराखंडची सत्ता असताना त्यांना चार धाम आठवले नाही. देवभूमी आठवली नाही. पण आता आम्ही चार धाम विकास करू देवभूमीचा विकास करू, असे ते म्हणत आहेत. चारधाम विकास हा त्यांच्या दृष्टीने सत्तेच्या खुर्चीकडे जाण्याचा मार्ग आहे, पण उत्तराखंडची जनता काँग्रेसला पूर्ण ओळखून बसली आहे. त्यांनी काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्याचा पण केला आहे असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
PM Modi attacks Congress again in Uttarakhand
महत्त्वाच्या बातम्या
- हिजाब वादाचे पडसाद; बुलडाण्यात १४४ कलम लागू; मोर्चा, निर्दशने आणि आंदोलनास मनाई
- अनिल देशमुखांच्या चुलत भावाच्या कंपन्यांकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांना बेकायदेशीर रक्कम वाटप; ईडीला संशय
- कोरोना संपल्यानंतरच जनतेची मास्कमधून मुक्ती; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सूचक वक्तव्य
- मुंबई महापालिका निवडणूक : एकीकडे प्रशासक नेमण्याची तयारी; दुसरीकडे 125 जागा जिंकण्याचा शिवसेनेचा दावा!!
- महापालिका निवडणुकीपूर्वी पुण्यात मेट्रो धावणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उदघाटन