वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आज दुपारी 4 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भारत-बांगलादेश मैत्री डिझेल पाइपलाइनचे उद्घाटन करतील. पीएमओने ही माहिती दिली आहे. ही 130 किलोमीटर लांबीची पाइपलाइन अंदाजे 377 कोटी रुपये खर्चून पूर्ण झाली आहे.PM Modi and Sheikh Hasina to Inaugurate India-Bangladesh Maitri Diesel Pipeline, Cost 377 Crores, 10 Lakh MT Annual Capacity
भारतातून पाइपलाइनद्वारे डिझेल आयात करण्याचा करार 2017 मध्ये झाला होता. त्यानंतर मार्च 2022 मध्ये ही पाइपलाइन बांधण्याचे काम सुरू झाले. हा प्रकल्प जून 2022 पर्यंत पूर्ण होणार होता, परंतु कोरोना महामारीमुळे विलंब झाला.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील ही पहिली क्रॉस-बॉर्डर ऊर्जा पाइपलाइन आहे. यामुळे दोन्ही देशांमधील ऊर्जा सुरक्षेमध्ये सहकार्य वाढेल.
सुरुवातीला बांगलादेशातील 7 जिल्ह्यांत पुरवठा
मैत्री डिझेल पाईपलाईनची वार्षिक 10 लाख मेट्रिक टन हाय-स्पीड डिझेलची वाहतूक करण्याची क्षमता आहे. सुरुवातीला यातून उत्तर बांगलादेशातील सात जिल्ह्यांना डिझेल पुरवठा होईल.
ढाक्याचे विद्युत राज्यमंत्री नसरुल हमीद यांनी सांगितले होते की, भारतातून डिझेल आयात करण्यासाठी सुमारे 131.5 किमी लांबीची पाइपलाइन बांधण्यात आली आहे.
या पाइपलाइनचा 126.5 किमीचा भाग बांगलादेशात आणि 5 किमी भारतात आहे. ही पाइपलाइन पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथून दिनाजपूरमधील पार्वतीपूर येथील मेघना पेट्रोलियम डेपोपर्यंत गेली आहे
PM Modi and Sheikh Hasina to Inaugurate India-Bangladesh Maitri Diesel Pipeline, Cost 377 Crores, 10 Lakh MT Annual Capacity
महत्वाच्या बातम्या
- बॅन हटल्यानंतर फेसबुकवर परतले अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, पहिली पोस्ट- आय एम बॅक!!
- पंतप्रधान मोदी आज ग्लोबल मिलेट्स परिषदेचे उद्घाटन करणार, 6 देशांचे कृषिमंत्रीही सहभागी होणार
- भारतावरचे परदेशी कर्ज मर्यादेत, अर्थव्यवस्था स्थिर; रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा निर्वाळा
- रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टाने जारी केले अटक वॉरंट!