नाशिक : भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी भाषणे वेगवेगळ्या ठिकाणी केली, पण दोघांच्या भाषणांमध्ये सूत्र मात्र विलक्षण समान राहिले. ते म्हणजे स्वदेशीच्या शक्तीवर भर देऊन जगात भारताचे “स्व” “तंत्र” निर्माण करू, हे ते सूत्र राहिले.PM Modi and Mohan Bhagwat speech in the same tune of Swadeshi
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परंपरेप्रमाणे लाल किल्ल्यावरून भाषण केले. त्या भाषणात त्यांनी पहिल्यांदाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गौरव पूर्ण उल्लेख केला कुठल्याही पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरच्या भाषणामध्ये केलेला तो संघाचा पहिला गौरव ठरला. याआधी एकही पंतप्रधानाने लाल किल्ल्याच्या भाषणातून संघाचा तसा उल्लेख केला नव्हता. संघाच्या शताब्दी वर्षाचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदींनी देशसेवा करणारे समर्पित कार्यकर्ते तयार करून संघाने शंभर वर्षे वाटचाल केली. व्यक्ती निर्माणापासून देश निर्माणापर्यंत मोठी कामे केली, याचा आपल्याला अभिमान असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
– मोदींचा स्वदेशीच्या ताकदीवर भर
पंतप्रधान मोदींच्या स्वातंत्र्य दिनाच्या आजच्या भाषणाचा सगळा स्वर आणि सूर स्वदेशी, स्वावलंबन आणि देशी तंत्रज्ञानाच्या निर्मितीवर राहिला. इतरांची रेषा पुसण्यापेक्षा आपण आपली रेषा आपली ऊर्जा वापरून मोठी करू, असे ते म्हणाले. स्वदेशीचा वापर सक्ती म्हणून नको, तर शक्ती म्हणून वापरू, या मुद्द्यावर त्यांनी भर दिला. स्वावलंबनातूनच ही शक्ती येते. दुसऱ्यांवर अवलंबून राहून शक्ती येत नाही म्हणून भारतीय तरुणांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये स्वतःचे तंत्रज्ञान निर्माण करावे. त्यासाठी भारत सरकार त्यांना सर्व मदत करेल, असे वक्तव्य मोदींनी केले. सुदर्शन चक्र शस्त्र प्रणालीची घोषणा त्यांनी केली ही सुदर्शन चक्र शस्त्र प्रणाली फक्त शत्रूला प्रत्युत्तर देणार नाही, तर त्याच्या अपेक्षेपेक्षा जास्त आक्रमकपणे त्याच्यावर हल्ला करेल, याची ग्वाही त्यांनी दिली.
पंतप्रधान मोदींच्या आजच्या भाषणातला सगळा भर भारताची मूलभूत शक्ती स्वतःच्या तंत्राने वाढविण्यावर राहिला.
डॉ. मोहन भागवत यांचे “स्व” “तंत्र” भाषण
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याही भाषणाची सगळे सूत्र स्वतंत्र याच संकल्पनेभोवती केंद्रित राहिले.
स्वतंत्रतेमध्ये “स्व”आणि “तंत्र” आहे. जेव्हा “स्व”च्या आधारावर “तंत्र” चालते, तेव्हा स्वातंत्र्य येते, असा स्वातंत्र्याचा वेगळा अर्थ डॉ. मोहन भागवत यांनी समजावून सांगितला.
आज स्वातंत्र्यदिनानिमित्त, ‘उत्कल विपन्न सहायता समिती, ओडिशा’ यांच्या वतीने भुवनेश्वर येथे आयोजित कार्यक्रमात, डॉ. मोहन भागवत यांनी ध्वजारोहणा केल्यानंतर उपस्थितांना संबोधित केले.
डॉ. मोहन भागवत म्हणाले :
“स्वातंत्र्यात “स्व” आणि “तंत्र” आहे. जेव्हा “स्व”च्या आधारावर “तंत्र” चालते, तेव्हा स्वातंत्र्य येते. भारत हा एक वैशिष्ट्यपूर्ण देश आहे. तो जगात सुख आणि शांती आणण्यासाठी जगतो. जगाला धर्म देण्यासाठी जगतो. म्हणूनच आपल्या राष्ट्रध्वजाच्या केंद्रस्थानी धर्मचक्र आहे. हा धर्म सर्वांना सोबत घेऊन, सर्वांना जोडून, सर्वांचा विकास करतो. त्यामुळे तो इहलोकी आणि परलोकी सर्वांना सुख देणारा आहे. हा धर्म जगाला देण्यासाठी भारत आहे, हे आपले वैशिष्ट्य आहे. हे देण्यासाठी आपले तंत्रसुद्धा आपले असले पाहिजे. ते “स्व”च्या आधारावर चालले पाहिजे.”
PM Modi and Mohan Bhagwat speech in the same tune of Swadeshi
महत्वाच्या बातम्या
- Pune Police : पुण्याचे पोलीस केवळ दंड वसूल करण्यासाठी आहेत का ?
- Supreme Court Lawyer : सर्वोच्च न्यायालयाबाहेर वकिलाची श्वानप्रेमीला मारहाण; दिल्ली-NCRमध्ये भटक्या कुत्र्यांवर बंदीविरोधात आंदोलन करत होता
- रघुराम राजन यांच्या बुद्धीभेदाला अमिताभ कांत यांचा उतारा; भारताला चीन बरोबर उत्पादन क्षेत्रात उतरवा!!
- NPCI Bans : 1 ऑक्टोबरपासून UPI द्वारे पैशाची मागणी पाठवता येणार नाही; NPCIचा फसवणूक रोखण्यासाठी मोठा निर्णय