विशेष प्रतिनिधी
देवास : पुढच्या 3 वर्षांमध्ये देशातल्या बचत गटांमधल्या आणखी 2 कोटी महिलांना “लखपती दीदी” बनवण्याचे लक्ष्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठेवले आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मध्य प्रदेशातल्या देवास मधल्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली. इतकेच नाही तर पंतप्रधान मोदींनी हे लक्ष्य साध्य करण्यासाठी यासाठी देवास मधल्या बचत गटाच्या महिलांची मदतही मागितली. PM Modi aims to promote women of SHGs, upscale cooperatives
विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी मोदींनी व्हर्च्युअल संवाद साधताना अनेक गोष्टी शेअर केल्या, तसेच संबंधित महिलांकडून त्यांच्या कामाची देखील माहिती जाणून घेतली.
पंतप्रधान मोदी म्हणाले, विकसित भारत संकल्प यात्रेतून केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ देशातल्या सगळ्या लाभार्थींपर्यंत पोहोचवण्याचे सरकारची महत्त्वाकांक्षा आहे. एकही पात्र लाभार्थी कुठल्याही कारणामुळे लाभापासून वंचित राहता कामा नये, ही सरकारची धारण आहे. त्यासाठी समाजातल्या वेगवेगळ्या घटकांच्या मदतीने ही विकसित भारत संकल्प यात्रा सुरू केली आहे. यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय आहे आणि तशी या यात्रेची गरजही आहे. पात्र लाभार्थ्यांना शोधून त्यांना सरकारच्या योजनांचे लाभ पोचविण्यात स्वयंसहाय्यता गट, बचत गट यांच्यातल्या महिलांनी सरकारला मदत करावी, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले.
स्वयंसहाय्यता गट आणि बचत गटांतील 10 कोटी महिलांना बँकांमधून आत्तापर्यंत 7.50 लाख कोटी रुपयांचा निधी वाटण्यातही आला आहे. त्याचबरोबर पुढच्या 3 वर्षांमध्ये स्वयंसहाय्यता गट आणि बचत गटातल्या आणखी तब्बल 2 कोटी महिलांना “लखपती दीदी” बनविण्याचे ध्येय आपण ठेवले असल्याचे पंतप्रधान मोदींनी आवर्जून नमूद केले.
यासाठी देखील पंतप्रधानांनी रुबिया खान यांच्यासारख्या देवास मध्ये मोठा बचत गट चालवणाऱ्या स्व विकास साधणाऱ्या महिलेची मदतही मागितली. ङस्व विकास साठी महिलांनी अभिनव संकल्पना राबवून ची प्रत्यक्ष जमिनीस स्तरावर अंमलबजावणी करावी यासाठी महिला स्वयंसहाय्यता गट आणि बचत गटांनी एकमेकांशी संपर्क देखील प्रस्थापित करावेत एकमेकांच्या कल्पना आणि अनुभव एकमेकांशी शेअर कराव्यात, असे आवाहनही पंतप्रधान मोदींनी यावेळी केले. पंतप्रधान मोदींनी या निमित्ताने अनेक महिलांचे अनुभवही जाणून घेतले.
भारत विकास संकल्प यात्रेत तब्बल 4500000 महिलांचे उज्ज्वला योजनेसाठी अर्ज मिळाले आहेत. 1 मिलियन लोकांना आयुष्मान भारत कार्ड कार्डाचे वाटप झाले आहे आणि त्याच अंतर्गत 12.50 लाख लोकांची वैद्यकीय तपासणी देखील झाली आहे, अशी माहिती पंतप्रधान मोदींनी दिली.
PM Modi aims to promote women of SHGs, upscale cooperatives
महत्वाच्या बातम्या
- अयोध्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी देशभरातील ‘या’ VVIP व्यक्तींना निमंत्रण!
- ऋषभ पंतसह अनेक हॉटेल मालकांची फसवणूक करणाऱ्या क्रिकेटपटूला अटक
- अबुधाबीमध्ये पहिले हिंदू मंदिर तयार, पंतप्रधान मोदी उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार
- पंतप्रधान मोदी दोन अमृत भारत आणि सहा वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार