• Download App
    देशात वस्त्रोद्योगवाढीसाठी पीएम मित्रा योजनेला मंजूरी, टेक्सटाईल पार्क साठी ४४४५ कोटी रुपयांची तरतूद | PM Mitra scheme has been approved, 4445 crore rs for 7 mega investment textile park

    देशात वस्त्रोद्योगवाढीसाठी पीएम मित्रा योजनेला मंजूरी, टेक्सटाईल पार्क साठी ४४४५ कोटी रुपयांची तरतूद

    विशेष प्रतिनिधी 

    दिल्ली : वस्त्रोद्योग विकासासाठी मंत्रिमंडळाने आज ‘पीएम  मित्रा’ या योजनेला मंजूरी दिली आहे. या योजनेअंतर्गत येत्या पाच वर्षात देशभरात 7 मेगा इन्व्हेस्टमेंट टेक्सटाईल पार्क उभारण्यात येणार आहेत. कोणकोणत्या जागी हे पार्क उभारण्यात येतील ह्या बद्दल माहिती समोर आलेली नाहीये. या योजनेमुळे 21 लाख नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

    PM Mitra scheme has been approved, 4445 crore rs for 7 mega investment textile park

    टेक्स्टाईल मेगापार्कसाठी सुमारे 4445 कोटी रु खर्च केले जाणार आहेत. अशी माहिती वाणिज्यमंत्री पियुष गोयल आणि अनुरागसिंह ठाकूर यांनी आज बैठकीतील निर्णयानंतर आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे.

    या योजनेमध्ये ‘5F’ फॉर्म्युला वापरला जाणार आहे. फार्म ते फायबर, फायबर ते फॅक्टरी, फॅक्टरी ते फॅशन, फॅशन ते फॉरेन.

    “ही योजना अर्थव्यवस्थेत वस्त्रोद्योग क्षेत्राच्या वाढीस मदत करेल. इतर कोणत्याही प्रतिस्पर्धी राष्ट्राकडे आमच्यासारखी textile ecosystem नाहीये, या पाचही क्षेत्रांमध्ये भारत मजबूत आहे, ”असे केंद्र सरकारने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

    उत्पादन युनिट सुरु करण्यासाठी सरकार कडून प्रत्येक पीएम मित्र पार्कसाठी 300 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. या युनिटवर राज्य सरकार आणि भारत सरकार दोघांना मालकी हक्क असेल तर मालकीचे रूप सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) मोडमध्ये असेल. तामिळनाडू, पंजाब, ओडिशा, आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान, आसाम, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांनी या योजनेमध्ये इंटरेस्ट व्यक्त केला आहे.


    PM Garib Kalyan Anna Yojana :80 कोटी लाभार्थ्यांना मिळणार 2 महिने मोफत अन्नधान्य ; मोदी सरकारचा दिलासादायक आणि महत्वपूर्ण निर्णय


    PM Mitra scheme has been approved, 4445 crore rs for 7 mega investment textile park

     

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य