• Download App
    PM Kisan : महत्त्वाची बातमी! योजनेच्या 10व्या हप्त्यासाठी आवश्यक आहे हे कार्ड ; अन्यथा मिळणार नाहीत पैसे । PM Kisan: Important News! This card is required for the 10th installment of the plan; Otherwise you will not get the money

    PM Kisan : महत्त्वाची बातमी! योजनेच्या 10व्या हप्त्यासाठी आवश्यक आहे हे कार्ड ; अन्यथा मिळणार नाहीत पैसे

    जर तुम्ही देखील पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi) फायदा घेणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. मोदी सरकारने नोंदणीची प्रक्रिया काहीशी बदलली आहे PM Kisan: Important News! This card is required for the 10th installment of the plan; Otherwise you will not get the money


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : जर तुम्ही देखील पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi) फायदा घेणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. मोदी सरकारने नोंदणीची प्रक्रिया काहीशी बदलली आहे. त्यामुळे आता पीएम किसान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या रजिस्ट्रेशनसाठी रेशनकार्ड (Ration Card) अनिवार्य करण्यात आले आहे. अर्थात आता तुम्हाला रेशन कार्ड असल्याशिवाय पीएम शेतकरी सन्मान शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी नोंदणी नाही करू शकत. शिवाय रेशन कार्ड अनिवार्यतेसह आता नोंदणीदरम्यान कागदपत्रांची केवळ सॉफ्टकॉपी (PDF) बनवून पोर्टवर अपलोड करावी लागेल.

    कशाप्रकारे जमा करावे लागतील कागदपत्र

    पीएम किसान योजनेसाठी नोंदणीच्या नवीन प्रणाली अंतर्गत, यापुढे रेशन कार्ड क्रमांकाशिवाय नोंदणी करणे शक्य होणार नाही. या व्यतिरिक्त आधार कार्ड, बँक पासबुक आणि घोषणापत्राची हार्ड कॉपी जमा करण्याची आवश्यकता दूर केली गेली आहे. आता पोर्टलवर कागदपत्रांची पीडीएफ फाइल तयार करून अपलोड करावी लागेल. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचणार आहे. तसेच नवीन प्रणालीमध्ये योजना अधिक पारदर्शक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. केंद्र सरकार 15 डिसेंबर 2021 पर्यंत पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्याची योजना आखत आहे. सरकारने गेल्यावर्षी या कालावधीदरम्यानचा हप्ता 25 डिसेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवला होता.



    अशाप्रकारे करा नोंदणी

    • याकरता शेतकऱ्यांना pmkisan.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल.
    • त्यानंतर त्याठिकाणी दिसणाऱ्या ‘फार्मर कॉर्नर’ (Farmers Corner) या टॅबवर क्लिक करा. याठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या नावाची या योजनेसाठी नोंदणी करू शकता.
    • याठिकाणी ‘New Farmer Registration’ या पर्यायावर क्लिक करून तुमचा आधार क्रमांक टाका
    • कॅप्चा कोड प्रविष्ट करून तुमचे राज्य निवडा, त्यानंतरच प्रोसेस पुढे जाईल
    • तुमची वैयक्तिक माहिती आणि बँक तपशील, शेतीविषयक तपशील विचारला जाईल
    • ही माहिती भरल्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.

    PM Kisan: Important News! This card is required for the 10th installment of the plan; Otherwise you will not get the money

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!