• Download App
    पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला सहा महिने मुदतवाढ, सप्टेंबरपर्यंत मिळणार मोफत धान्य|PM Garib Kalyan Yojana gets six months extension, free foodgrains till September

    पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला सहा महिने मुदतवाढ, सप्टेंबरपर्यंत मिळणार मोफत धान्य

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याच निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळं ही योजना आता सप्टेंबर 2022 पर्यंत सुरु राहील.PM Garib Kalyan Yojana gets six months extension, free foodgrains till September

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन यांसंदर्भात माहिती दिली आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेद्वारे 80 कोटी नागरिकांना लाभ झाल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, भारतवषार्चं सामर्थ्य देशातील एक एक नागरिकाच्या शक्तीमध्ये आहे. त्या शक्तीला ताकद देण्यासाठी सरकारनं या योजनेला मुदतवाढ दिली.



    पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना अतंर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याद्वारे 80 कोटी नागरिकांना मोफत राशन दिलं जातं. या योजनेतील नागरिकांना रेशनकार्डवर मोफत राशन दिलं जातं. या योजनेद्वारे तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ प्रति व्यक्ती दिला जातो.

    केंद्र सरकारकडून देण्यात गरीब कल्याण योजनेद्वारे देण्यात येणार धान्य देशातील 80 कोटी नागरिकांना देण्यात येतं. ज्या व्यक्तींकडे राशन कार्ड आहे त्यांना धान्य मिळतं. ज्या व्यक्तींकडे राशन कार्ड नाही त्यांना या योजनेद्वारे धान्य मिळत नाही. कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाल्यानंतर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरु करण्यात आली होती.

    PM Garib Kalyan Yojana gets six months extension, free foodgrains till September

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार