Monday, 5 May 2025
  • Download App
    जयपूरमध्ये बॉम्बस्फोट घडविण्याचा कट, पोलीसांनी सुफा संघटनेच्या तिघा कट्टरपंथियांना केली अटक|Plot to carry out bomb blast in Jaipur

    जयपूरमध्ये बॉम्बस्फोट घडविण्याचा कट, पोलीसांनी सुफा संघटनेच्या तिघा कट्टरपंथियांना केली अटक

    विशेष प्रतिनिधी

    जयपूर : जयपूर शहरात साखळी बॉम्बस्फोट करण्याचा कट राजस्थान पोलिसांनी उधळून लावला आहे. राजस्थान पोलिसांनी बुधवारी मध्य प्रदेशातील सुफा संघटनेच्या 3 कट्टरपंथीयांना चित्तोडगडच्या निंबाहेरा येथून अटक केली आहे. त्याच्या कारमधून बॉम्ब बनवण्याचे साहित्य, टायमर आणि 12 किलो आरडीएक्स जप्त करण्यात आले आहे.Plot to carry out bomb blast in Jaipur

    जयपूरमध्ये 3 ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात येणार होते. हा घातपात घडण्याआधीच पोलिसांनी त्याला पकडले आहे. आरोपी निंबाहेरा येथे बॉम्ब बनवून ते दुसºया गटाला देणार होते. ही कुख्यात सुफा संघटना 2012-13 मध्ये मध्य प्रदेशातील रतलाममध्ये सक्रिय झाली होती. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून शांत राहिल्यानंतर आता पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे.



    सूफा ही कट्टरपंथी विचारसरणीच्या 40-45 तरुणांची इस्लामिक संघटना आहे. ही संघटना दहशतवाद्यांच्या स्लीपर सेलप्रमाणे काम करते. समाजातील कट्टरपंथी विचारधारा आणि पद्धतींची पुरस्कार ही संघटना करते. तसेच मुस्लिम समाजातील काही विवाह आणि इतर कार्यक्रमांना हिंदू प्रथा असे म्हणून विरोध दर्शवला होता.

    उदयपूर आणि जयपूर एटीएसचे पथक बुधवारी संध्याकाळी उशिरा निंबाहेरा येथे दहशतवाद्यांची चौकशी करण्यासाठी दाखल झाले होते. याशिवाय मध्य प्रदेशचे एटीएस पथकही दहशतवाद्यांच्या चौकशीसाठी दाखल . जुबेर, अल्तमास आणि सरफुद्दीन उर्फ सैफुल्ला अशी आरोपींची नावे आहेत.

    ते रतलाम येथून पळून आले असून निंबाहेराजवळील राणीखेडा येथे वास्तव्याला होते. राजस्थानमध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या माहितीवरून रतलाम येथून दोघांनाही ताब्यात घेण्यात आल्याचे उदयपूरचे पोलिस महानिरीक्षक हिंगलाज दान यांनी सांगितले.

    Plot to carry out bomb blast in Jaipur

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    राहुल गांधी तर फक्त “निवडक” चुकांची जबाबदारी घेतली; पण काँग्रेसच्या चुकांची किंमत सगळ्या देशाला मोजावी लागली!!

    Himanta Biswa Sarma : आसामात पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या दोघांना अटक; पहलगाम हल्ल्यानंतर 39 जण ताब्यात

    Cyber attacks : PDF फाइल्स पाठवून पाकिस्तानी हॅकर्सचे सायबर हल्ले; भारतीय युजर्सचे संगणक, लॅपटॉप आणि फोन टार्गेटवर