• Download App
    श्यामजी कृष्ण वर्मांच्या पवित्र अस्थी भारतात आणल्यात;शहीद उधम सिंग यांचे पिस्तूल - डायरीही ब्रिटिशांच्या ताब्यातून भारतात परत आणा…!! please use offices of Govt of India to bring back the personal effects like the pistol & personal diary of Shaheed Udham Singh

    श्यामजी कृष्ण वर्मांच्या पवित्र अस्थी भारतात आणल्यात;शहीद उधम सिंग यांचे पिस्तूल – डायरीही ब्रिटिशांच्या ताब्यातून भारतात परत आणा…!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली – जालियानवाला बागेत ब्रिटिशांनी केलेल्या क्रूर हत्याकांडाचा सूड घेणारे क्रांतिकारक शहीद उधम सिंग यांचे ऐतिहासिक पिस्तुल आणि डायरी आजही ब्रिटिशांच्या ताब्यात आहेत. हा ऐतिहासिक ठेवा भारतात परत आणवा, अशी आग्रही मागणी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. please use offices of Govt of India to bring back the personal effects like the pistol & personal diary of Shaheed Udham Singh

    जालियानवाला बागेच्या हुतात्म्यांचे स्मारक पंतप्रधानांनी आज देशाला समर्पित केले. तेव्हा ते बोलत होते. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी बोलताना कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंतप्रधानांकडे शहीद उधमसिंग यांचे पिस्तुल आणि डायरी ब्रिटिशांच्या ताब्यातून भारतात परत आणण्याची मागणी केली. याबाबत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहिल्याची आठवण अमरिंदर सिंग यांनी करून दिली.

    -मोदींनी जिनिव्हातून आणली

    नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना प्रख्यात क्रांतिकारक श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या पवित्र अस्थी आणि रक्षा जिनिव्हातून परत आणल्या आणि श्यामजी कृष्ण वर्मा यांचे स्मारक गुजरातमध्ये बांधले आहे. त्या मोदींकडे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शहीद उधम सिंग यांच्या पिस्तूल आणि ड़ायरी या ऐतिहासिक वस्तू भारतात परत आणण्याची मागणी केली आहे.

    शहीद उधम सिंग यांनी मायकल ओ डायर या जालिवायनवाला बागेत निशःस्त्र भारतीयांचे हत्याकांड करणाऱ्या ब्रिटिश जुलमी अधिकाऱ्याला लंडनमध्ये भर कार्यक्रमात गोळ्या घालून ठार मारले होते. जालियानवाला हत्याकांडाचा त्यांनी सूड घेतला होता. त्या शहीद उधम सिंग यांचे पिस्तुल आणि डायरी आजही ब्रिटिशांच्या ताब्यात आहे. या ऐतिहासिक महत्त्वाच्या वस्तू भारतात परत आणण्याची मागणी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केली आहे.

    -आदिवासींच्या योगदानाचा गौरव

    देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात शूर आदिवासींच्या योगदान फार मोठे आहे. त्यांनी उभारलेले लढे दीर्घ होते आणि ब्रिटिशांना हादरविणारे होते. परंतु, या शूर आदिवासींच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाची पुरेशी दखल घेतली नव्हती, अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमात व्यक्त केली.

    स्वातंत्र्य लढ्यात आदिवासींच्या योगदानाचा पंतप्रधानांनी उचित शब्दांमध्ये गौरव केला. शूर आदिवासी स्वातंत्र्य योध्द्यांच्या स्मरणार्थ देशाच्या ९ राज्यांमध्ये स्मारके उभारण्याचे काम जोरात सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ही सर्व स्मारके पूर्ण करून देशाला समर्पित होणे अपेक्षित आहे.

    please use offices of Govt of India to bring back the personal effects like the pistol & personal diary of Shaheed Udham Singh

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य