• Download App
    उत्तर प्रदेशात लॉकडाऊन कृपया लावा ; उच्च न्यायालयाची सरकारला हात जोडून विनंती Please lockdown in Uttar Pradesh; High Court joins hands with government

    उत्तर प्रदेशात लॉकडाऊन कृपया लावा ; उच्च न्यायालयाची सरकारला हात जोडून विनंती

    वृत्तसंस्था

    अलाहाबाद : उत्तर प्रदेशात लॉकडाऊन लावायचा का नाही, यावरून सरकार आणि न्यायालयात जोरदार चर्चा सुरु आहेत. सरकार म्हणते लॉकडाऊन नको तर उच्च न्यायालय म्हणते जीव महत्वाचा असल्याने लॉकडाऊन आवश्यक आहे. आता उच्च न्यायालयाने लॉकडाऊन लावावा, अशी विनंती राज्य सरकरला केली आहे. Please lockdown in Uttar Pradesh; High Court joins hands with government

    राज्यात कोरोनाचे तांडव सुरु असून रुग्णांना ऑक्सिजन मिळत नाही. डॉक्टरांची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे दोन आठवडयांचा लॉकडाऊन लावा, अशी विनंती हात जोडून करत आहोत, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे.



    गेल्या आठवडय़ात उच्च न्यायालयाने सहा शहरांत लॉकडाऊनचे आदेश दिले होते. मात्र मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. बुधवारी न्यायमूर्ती सिद्धार्थ वर्मा यांच्या खंडपीठापुढे पुन्हा सुनावणी झाली. तेव्हा त्यांनी हात जोडून विनंती करतो, लॉकडाऊन लावा, अशी सूचना केली आहे.

    Please lockdown in Uttar Pradesh; High Court joins hands with government

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची “कमाल”; 613 कोटींच्या भाड्याच्या यांत्रिक झाडूंनी बंगलोरचे रस्ते झाडणार!!

    Mehbooba Mufti : मेहबूबा म्हणाल्या- लाल किल्ल्यासमोर काश्मिरी समस्यांचे पडसाद; सरकारचे जम्मू-काश्मीर सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन, पण दिल्लीच धोक्यात

    India US : टॅरिफनंतर भारत-अमेरिका यांच्यात पहिला करार; भारत आपल्या गरजेच्या 10% गॅस अमेरिकेकडून खरेदी करणार