• Download App
    plasma therapy has been dropped from covid-19 treatment ICMR and AIIMS releases new guidelines

    कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी कुचकामी, उपचारातून हटविली ; एम्स, आयसीएमआरकडून नवीनमार्गदर्शक तत्वे जारी

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : कोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविण्याचा निर्णय एम्स आणि आयसीएमआ यांनी घेतला आहे. नवीन गाइडलाइन जारी केली आहे. plasma therapy has been dropped from covid-19 treatment ICMR and AIIMS releases new guidelines

    इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR),नॅशनल टास्क फोर्सच्या बैठकीत प्लाझ्मा थेरपी काढून टाकण्याचा निर्णय घेतला. उपचारात प्लाझ्मा थेरपी प्रभावी नाही आणि अनेक प्रकरणांमध्ये याचा अयोग्यपद्धतीने वापर करण्यात आला आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.



    आयसीएमआर चे वैज्ञानिक डॉ. समीरन पांडा यांनी सांगितले की, बीजेएममध्ये प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीतून प्लाझ्मा थेरपीचा फायदा होत नाही. प्लाझ्मा थेरपी महाग असून ती भीती निर्माण करत आहे. आरोग्य यंत्रणेवर ओझे वाढत आहे. दात्याच्या प्लाझ्माच्या गुणवत्तेची हमी दिली जात नाही. प्लाझ्मा अँटीबॉडी पुरेशा संख्येने असणे आवश्यक आहे, परंतु हे निश्चित नसते.

    यापूर्वी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सुरुवातीच्या मध्यम रोगाच्या अवस्थेत म्हणजेच लक्षणे दिसल्यापासून सात दिवसांच्या आत हाय डोनर प्लाझ्माची उपलब्धता झाली, तर प्लाझ्मा थेरपीच्या ‘ऑफ लेबल’ वापरास परवानगी होती. काही डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी मुख्य वैज्ञानिक सल्लागार के विजय राघवन यांना पत्र लिहून ती काढून टाकण्याची मागणी केली होती, तेव्हा हा निर्णय घेतला आहे.

    प्लाझ्मा थेरपी तर्कहीन

    प्लाझ्मा थेरपीचा तर्कहीन आणि अवैज्ञानिक उपयोग केला जात असल्याचा त्यांनी इशारा दिला होता. आयसीएमआरचे प्रमुख बलराम भार्गव आणि एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनाही हे पत्र पाठविले. प्लाझ्मा पद्धतील मार्गदर्शक तत्त्वे आणि पुरावा यावर आधारित नाही. देशभरातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, की कोरोना रुग्णांना प्लाझ्मा थेरपीचा काही उपयोग नाही. परंतु रुग्णालयात याचा उपयोग तर्कहीनपणे केला जात आहे.

    प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय?

    प्लाझ्मा थेरपीमध्ये, कोविड-19 मधून बरे झालेल्या रुग्णाच्या रक्तात उपस्थित अँटीबॉडीज गंभीर रुग्णांना दिली जातात. वृत्तानुसार, तज्ज्ञांच्या मते, 11,588 रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीची चाचणी घेतल्यानंतर असे आढळून आले की, यामुळे रुग्णांच्या मृत्यू आणि रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याच्या प्रमाणात काही फरक पडला नाही.

    plasma therapy has been dropped from covid-19 treatment ICMR and AIIMS releases new guidelines

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य