• Download App
    अवघ्या एका नागरिकाला घेऊन रुमानियाचे विमान मायदेशी परतले|Plane took only one passenger and flied back

    अवघ्या एका नागरिकाला घेऊन रुमानियाचे विमान मायदेशी परतले

     

    बुखारेस्ट – काबूल विमानतळावरून आपल्या देशवासियांची सुटका करण्यासाठी गेलेले रोमानियाचे सी-१३० हर्क्युलस हे लष्करी विमान केवळ एका नागरिकाला घेऊन मायदेशी परतले. यावरुन रुम्नियची देशाच्या नागरिकांप्रती असलेली काळजी समजून येते असे मानले जाते.Plane took only one passenger and flied back

    काबूलमध्ये प्रचंड गोंधळाची स्थिती असल्याने रोमानियाच्या इतर नागरिकांबरोबर ऐनवेळी संपर्क होऊ न शकला नाही. त्यामुळे त्यांना न घेताच विमानाला परतावे लागले. रोमानियातून विमानाने उड्डाण करतेवेळी एकूण ३३ नागरिकांना काबूल विमानतळावरून परत आणण्याचे नियोजन होते.



    विमान काबूलमध्ये पोहोचले, मात्र एका नागरिकाव्यतिरिक्त इतर कोणीही विमानतळापर्यंत पोहोचू शकले नाही. या उर्वरित जणांना आणण्यासाठी विमानाची आणखी एक फेरी केली जाणार आहे.
    दरम्यान, अफगाणिस्तानात काम करणाऱ्या युरोपीय महासंघाच्या (ईयू) १०६ कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुखरुप परत आणल्याचे ‘ईयू’ने सांगितले. अद्यापही ३०० जण काबूलमध्ये अडकून पडले असल्याचेही ‘ईयू’चे परराष्ट्र धोरण प्रमुख जोसेफ बोरेल यांनी सांगितले.

    Plane took only one passenger and flied back

    महत्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य