• Download App
    Plane crashes during takeoff in Kathmandu Nepal five dead

    नेपाळमध्ये विमानाचा भयंकर अपघात, 18 जणांचा मृत्यू; पायलट जखमी; काठमांडूहून उड्डाण घेताच दुर्घटना

    या विमानात १९ जण होते, या दुर्घटनेत अनेकजण जखमी देखील झाले आहेत Plane crashes during takeoff in Kathmandu Nepal five dead

    विशेष प्रतिनिधी

    काठमांडू : नेपाळची राजधानी काठमांडू येथे विमान कोसळले आहे. या अपघातात सध्या 18 जणांचा मृत्यू झाला आहे. जखमी पायलट कॅप्टन मनीष शाक्य यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विमानात कर्मचाऱ्यांसह 19 जण होते. ते काठमांडूहून पोखराला जात होते.

    त्रिभुवन विमानतळावरून विमानाने उड्डाण केले. यानंतर काही वेळातच सकाळी अकराच्या सुमारास अपघात झाला. 9N-AME हे विमान सूर्या एअरलाइन्सचे होते. काठमांडू पोस्टनुसार, पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी बचाव कार्य करत आहेत.

    पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, एका सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले की, अपघातानंतर विमानाला आग लागली. ते लगेचच विझवण्यात आले. घटनास्थळावरून समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये धुराचे लोट उठताना दिसत आहेत. मात्र हा अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

    यापूर्वी 14 जानेवारी 2023 रोजी नेपाळमध्ये विमान अपघात झाला होता. या अपघातात काठमांडूपासून 205 किमी दूर पोखरामध्ये यति एअरलाइन्सचे विमान कोसळले. हे एटीआर-72 विमान होते, ज्यामध्ये 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्याच्या अवघ्या 10 सेकंद आधी विमान एका टेकडीवर आदळले. यामुळे विमानाला आग लागली आणि ते खड्ड्यात पडले.

    लष्कराचे जवान घटनास्थळी पाठवले

    अपघाताची माहिती मिळताच सरकारने मदत आणि बचाव कार्यासाठी लष्कराचे जवान घटनास्थळी पाठवले. वैद्यकीय आणि लष्कराचे जवान मदतकार्यात गुंतले आहेत. ज्या प्रकारची आग लागली आहे ती वाईट बातमी दर्शवत आहे.

    Plane crashes during takeoff in Kathmandu Nepal five dead

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!