• Download App
    भारतीय उद्योगांची कार्यप्रणाली राष्टविरोधी, टाटांसह उद्योजकांना केंद्रीय व्यापार मंत्री पियुष गोयल यांनी सुनावले, उद्योगक्षेत्रात खळबळ|Piyush Goyal, Union Trade Minister, described the working of Indian industries as anti-national, including Tatas.

    भारतीय उद्योगांची कार्यप्रणाली राष्ट्रविरोधी, टाटांसह उद्योजकांना केंद्रीय व्यापार मंत्री पियुष गोयल यांनी सुनावले, उद्योगक्षेत्रात खळबळ

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारतीय उद्योगांची कार्यप्रणाली राष्टविरोधी आहे. जपान, कोरिया यासारख्या देशातील कंपन्या राष्ट्रीय हिताला प्राधान्य देतात. परंतु, टाटा समुहासारख्या कंपन्या अगदी दहा पैशासाठीही देशाचे हित पाहत नाहीत असा हल्लाबोल केंद्रीय व्यापार मंत्री पियुष गोयल यांनी केला आहे. गोयल यांच्या या वक्तव्यामुळे उद्योगक्षेत्रात खळबळ उडाली आहे. लोभ सोडून विकासाच्या प्रयत्नातही सरकारला सहकार्य करा, असे आवाहन त्यांनी केले.Piyush Goyal, Union Trade Minister, described the working of Indian industries as anti-national, including Tatas.

    कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या वार्षिक सभेत गोयल बोलत होते. सुमारे १५० वर्षाचा इतिहास असलेल्या टाटा समुहाचे त्यांनी उदाहरण दिले. आपण अगदी मनापासून बोलत आहोत असेही ते म्हणाले. या भाषणानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सीआयआयला या कार्यक्रमाचा व्हिडीओ त्यांच्या यू ट्यूब चॅनलवरून काढून टाकण्यास सांगितले. संपादित व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता. मात्र, नंतर हा व्हिडीओही काढून टाकण्यात आला.



    टाटा सन्सच्या इन्फ्रास्ट्रक्चर, डिफेन्स आणि एरोस्पेस विभागाचे अध्यक्ष बनमाली अग्रवाल यांच्याकडे इशारा करून गोयल म्हणाले, त्यांना दु:खाने सांगावे लागत आहे की व्यापार मंत्रालयाने ग्राहकांच्या हितासाठी केलेल्या नियमावलीला टाटा सन्सने विरोध केला आहे. मी, मी, माझी कंपनी याच्या पलीकडे जाऊन आपण कधी विचार करणार आहे? असा सवालही गोयल यांनी त्यांना केला.

    गोयल म्हणाले, टाटा समुहाने आणि इतरांनी एक-दोन परदेशी कंपन्या विकत घेतल्या हे तुम्हाला महत्वाचे वाटते पण राष्टहित महत्वाचे वाटत नाही का? आपण टाटा समुहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनाही हेच विचारले होते.टाटा समुहाने गोयल यांच्या वक्तव्यावर काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. सरकारकडून उद्योगांना प्राधान्यक्रमाचे विषय नेहमीच सांगितले जातात. त्यामध्ये काहीही गैर नाही. परंतु, सीआयआयच्या सभेत काही विशिष्ट उद्योगांना त्यांच्या कार्यपध्दतीबाबत विचारणा करण्यात आली. ते राष्टहितात काम करत नाहीत असा आरोपही करण्यात आला.

    गोयल यांच्या वक्तव्यामुळे विशेषत: उद्योजक गोंधळले आहेत. उद्योगांना सरकारचा विश्वास राहिला नाही असे त्यांना वाटू लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय उद्योगांना संपूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी अधिकाधिक जोखीम घेत देशात गुंतवणुकीचे आवाहन केले होते. मात्र, त्यानंतर गोयल यांचे वक्तव्य आल्याने संभ्रमाचे वातावरण आहे.

    भारतीय उद्योगांचे प्राधान्यक्रम आणि देशाप्रति बांधिलकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना गोयल यांनी टाटा स्टिलला आव्हान दिले की ते आपली उत्पादने जपान किंवा कोरियाला विकू शकतात का? ते म्हणाले या देशातील कंपन्या या राष्ट्रवादी आहेत. त्या पोलाद आयात करणार नाहीत. परंतु, याउलट आपल्या देशातील कंपन्या मात्र उत्पादनाची किंमत केवळ दहा पैशांनी कमी करण्यासाठी आयातीवर निर्बंध आणले किंवा ड्युटी वाढविली की लगेच लॉबींग करून विरोध करतात.

    गोयल म्हणाले आम्ही राष्ट्रवादी भावनेबद्दल बोलतो तेव्हा आमच्यावर माध्यमांमधून सनातनी आणि मागासलेले म्हणून टीका होते. मात्र, जपान, कोरियामध्ये कोणीही याला मागास म्हणत नाही. परदेशी कंपन्यांच्या लोभाला बळी पडू नका. प्रामाणिकपणे चांगल्या मार्गाने व्यवसाय करण्याचे स्वागतच आहे. मात्र, मी अनेकदा पार्टनरशिपची नावे वाचतो आणि फलाना ढिमका दिसतात तेव्हा दु:ख होते.

    काही हातांमध्येच प्रचंड नफा गेल्याने देशापुढे प्रश्न निर्माण होणार आहेत. काही जणांच्या लोभासाठी गरजुंना वंचित ठेऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले.भारतीय उद्योग स्टार्टअप साठी प्रारंभिक टप्यात निधी देत नाहीत याबद्दल खंत व्यक्त करताना गोयल म्हणाले, उदय (कोटक), पवन (गोयंका) टाटाज, अंबानीज, बजाज आणि बिर्ला यांच्याशी मी अनेकदा बोललो आहे. तुम्ही स्टार्टअपच्य माध्यमातून पैसे कमावू शकला नाहीत तरी देशासाठी तेवढे बलिदान तर द्यायलाच हवे.

    परिसराचा विकास ही सुध्दा उद्योगांची जबाबदारी असल्याकडे लक्ष वेधत गोयल म्हणाले, मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीजवळही अविकसित आदिवासी भाग आहे. अशी विषमता देश किती काळपर्यंत सहन करू शकतो याला मर्यादा आहेत.

    आम्ही बुलेट ट्रेनसाठी पालघरमध्ये जमीन मिळवण्याचा प्रयत्न करत असताना विरोध झाला. का? कारण त्यांचा प्रश्न होता की तुम्ही आमच्यासाठी काय केले? तुम्ही आमची जमीन घेत आहात आणि रस्ते, पायाभूत सुविधा, रेल्वे मिळवत आहात. पण आमच्या जीवनात कोणतीही सुधारणा नाही. लोकांचा संयम कधीतरी संपला तर हे चिंतेचे कारण असू शकेल. त्यामुळे विकास ही केवळ सरकारची जबाबदारी नाही तर त्यासाठी संयुक्तपणे प्रयत्न केले पाहिजेत.

    Piyush Goyal, Union Trade Minister, described the working of Indian industries as anti-national, including Tatas.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!