आगामी काही वर्षातच भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार, असल्याचही म्हणाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशभरात आज (२२ जुलै) ४४ ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी या कार्यक्रमाशी व्हर्चुअली जुडले आहेत. यावेळी त्यांनी ७० हजारांहून अधिक तरुणांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नियुक्ती पत्रांचे वाटप केले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदी सातत्याने जनतेला विविध भेटी देत आहेत. याच क्रमाने मोदींनी विविध विभाग आणि संस्थांमध्ये भरती झालेल्या तरुणांना ऑनलाइन नियुक्ती पत्रांचे वाटप केले आहे. Phone banking scam is one of the biggest scams of the previous government PM Modis statement
यावेळी कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, “आजचा दिवस देशासाठी ऐतिहासिक आहे. तरुणांना सरकारी नोकरीत सहभागी होण्याची ही मोठी संधी आहे. तुम्हाला देशाचा अभिमान वाटेल. मागील ९ वर्षात भारत पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे आणि आगामी काही वर्षातच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे.
आजचा दिवस ऐतिहासिक –
पंतप्रधान म्हणाले, “ज्या युवकांना नियुक्तीपत्रे मिळत आहेत त्यांच्यासाठी हा एक संस्मरणीय दिवस आहे, परंतु त्याच वेळी हा देशासाठी एक अतिशय ऐतिहासिक दिवस आहे. याच दिवशी (२२ जुलै) १९४७ मध्ये संविधान सभेने तिरंगा सध्याच्या स्वरूपात स्वीकारला होता.” ते पुढे म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देश विकासाच्या ध्येयावर काम करत असताना सरकारी नोकरीत सहभागी होण्याची मोठी संधी आहे. युवकांच्या मेहनतीचे हे फळ असून नियुक्तीपत्र मिळालेल्या सर्व तरुणांचे अभिनंदन.
गांधी कुटुंबावर टीका –
पंतप्रधान मोदींनी गांधी कुटुंबाचे नाव न घेता त्यांच्यावर हल्लाबोल केला आणि म्हटले की, देशात एकेकाळी फोन बँकिंग घोटाळा व्हायचा, पूर्वीच्या सरकारमध्ये एकाच कुटुंबातील लोकांना बँकांकडून कर्ज मिळायचे. ते म्हणाले की, मागील सरकारने बँकांचे नुकसान केले आणि ज्यांनी बँकांची लूट केली त्यांची मालमत्ता आम्ही जप्त केली.
ते म्हणाले, “९ वर्षांपूर्वी फोन बँकिंग माझ्या आणि तुमच्यासारख्या सामान्य नागरिकांसाठी नव्हती. त्यावेळी एका विशिष्ट कुटुंबातील काही शक्तिशाली नेते बँकेत फोन करून आपल्या प्रियजनांना हजारो कोटींची कर्जे मिळवून देत असत. ही कर्जे कधीच फेडली गेली नाहीत. हा फोन बँकिंग घोटाळा मागील सरकारच्या सर्वात मोठ्या घोटाळ्यांपैकी एक होता.” तसेच पंतप्रधान पुढे म्हणाले की, ‘’अर्थव्यवस्थेच्या विस्तारात आपले बँकिंग क्षेत्रही महत्त्वाची भूमिका बजावते. आज भारत अशा देशांपैकी एक आहे जिथे बँकिंग क्षेत्र सर्वात मजबूत मानले जाते, परंतु नऊ वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. सत्तेचा स्वार्थ जेव्हा राष्ट्रहितावर वर्चस्व गाजवतो तेव्हा कसली उधळपट्टी होते, याची देशात अनेक उदाहरणे आहेत. आपल्या बँकिंग क्षेत्राला मागील सरकारच्या काळात हा विनाश जाणवला आहे.’’
Phone banking scam is one of the biggest scams of the previous government PM Modis statement
महत्वाच्या बातम्या
- कर्नाटकात ‘जेडीएस’ने निवडली भाजपाची साथ, कुमारस्वामींने केले जाहीर, म्हणाले…
- राजस्थानातल्या महिला अत्याचाराविरुद्ध आवाज उठवणाऱ्या काँग्रेसच्या मंत्र्याला मुख्यमंत्री अशोक गेहलोतांचा डच्चू!!
- मणिपूरवर बोलणाऱ्या गेहलोत सरकारला आरसा दाखवणाऱ्या राजेंद्र गुढा यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी!
- नागराज मंजुळेंचा नवा सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला