NET/SET/SLET पात्रता ही किमान पात्रता असणार
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) एक मोठा निर्णय घेत सहाय्यक प्राध्यापकांच्या भरतीसाठी पीएचडी ची आवश्यकता नसल्याचे जाहीर केले आहे. PhD not mandatory for recruitment as Assistant Professor UGC
UGC चे अध्यक्ष एम जगदेश कुमार यांनी UGC च्या गॅझेट नोटिफिकेशनची माहिती ट्विटद्वारे शेअर केली आहे. ते म्हणाले की नवीन नियम १ जुलै २०२३ पासून लागू होणार आहेत. प्रोफेसर कुमार यांच्या मते, ‘पीएचडीची पात्रता आता १ जुलै २०२३ पासून असिस्टंट प्रोफेसर म्हणून नियुक्तीसाठी केवळ ऐच्छिक असेल. सर्व उच्च शिक्षण संस्थांसाठी सहाय्यक प्राध्यापक पदासाठी थेट भरतीसाठी नेट/सेट/एसएलईटी हा किमान निकष असेल.
जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ‘विद्यापीठ अनुदान आयोगाने शिक्षक आणि इतर शैक्षणिक कर्मचारी नियमन २०१८च्या नियुक्तीसाठी किमान पात्रता सुधारित केली आहे. आता उच्च शिक्षणातील सहाय्यक प्राध्यापकांच्या पदांसाठी थेट भरतीसाठी NET/SET/SLET पात्रता ही किमान पात्रता असणार आहे.
PhD not mandatory for recruitment as Assistant Professor UGC
महत्वाच्या बातम्या
- भुजबळांनी उलगडले बंडाचे “रहस्य”; शरद पवार आमचे गुरु, गुरुपौर्णिमेलाच त्यांना दिली सत्तेची गुरुदक्षिणा!!
- आता समान नागरी कायदा लागू करण्याची वेळ आली आहे, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे वक्तव्य
- पवारांचा आदेश धुडकावून अजितदादांच्या मेळाव्यात भुजबळांच्या एमईटीत शरद पवारांची पोस्टर्स!!; 41 आमदार गटात असल्याचा तटकरेंचा दावा
- विरोधी पक्षनेतेपदाबाबत काँग्रेसचे वेट अँड वॉच, आमदारांच्या बैठकीत कोणतीही चर्चा नाही