वृत्तसंस्था
नवी दिल्ली : PG पदव्युत्तर वैद्यकीय “नीट” अर्थात प्रवेश परीक्षा संदर्भात एक विनंती केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाला केली आहे. या परीक्षेसाठी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा विषय लवकरात लवकर सुनावणी घेऊन मार्गी लावावा, अशी विनंती केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाला केली आहे. PG medical examinations ews reservation issue
या विनंतीचा विचार करून आपण सरन्यायाधीश एन. व्ही. रमन्ना यांच्याशी विचारविनिमय करून उद्या किंवा परवाच सुनावणी घेऊ, असे अशी ग्वाही सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी केंद्र सरकारला दिली आहे.
पदव्युत्तर वैद्यकीय “नीट” परीक्षेच्या तारखा जवळ येत आहेत. या पार्श्वभूमीवर देशभरातील आर्थिक दुर्बल घटकांचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे/ त्यातून या घटकातील पात्र विद्यार्थ्यांना न्याय मिळेल, अशी भूमिका केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात आज मांडली आहे.
केंद्र सरकारच्या या भूमिकेला न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी अनुकूल प्रतिसाद देत सर न्यायाधीश रमन्ना यांच्याशी विचारविनिमय करून या प्रकरणाची उद्या किंवा परवा सुनावणी घेऊन त्यावर लवकरात लवकर निर्णय देण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली आहे. केंद्र सरकारने ज्या तळमळीने आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची बाजू मांडली आहे ते पाहतात ही सुनावणी लवकर सुप्रीम कोर्टात होणे अपेक्षित आहे.
PG medical examinations ews reservation issue
महत्त्वाच्या बातम्या
- वादग्रस्त : मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक म्हणाले- मोदी अहंकारी! मी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर त्यांना भांडलो
- मालमत्ता कर माफीबाबत दुजाभाव का ?मुंबईप्रमाणे अन्य शहरातील जनतेची अपेक्षा
- खासदार सुजय विखे यांना कोरोनाची लागण
- राज्यातील आणखी दोन आमदारांना कोरोना, हिवाळी अधिवेशनामुळे संसर्गाला आमंत्रण
- अभिनेता जॉन अब्राहमसह पत्नी प्रियादेखील कोरोना पॉझिटिव्ह