Pfizer Vaccine : कोरोना महामारीच्या या काळात जगभरात कोरोना लसींना मोठी मागणी आली आहे. यादरम्यान अमेरिकीची दिग्गज औषध निर्माती कंपनी फायजर (Pfizer) ने भारत सरकारला आपल्या कोरोनावरील लसीचा ‘ना नफा’ तत्त्वावर पुरवठा करण्याचा प्रस्ताव दिला आहे. pfizer Vaccine offered on Non profit to supply in India amid corona crisis
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या या काळात जगभरात कोरोना लसींना मोठी मागणी आली आहे. यादरम्यान अमेरिकीची दिग्गज औषध निर्माती कंपनी फायजर (Pfizer) ने भारत सरकारला आपल्या कोरोनावरील लसीचा ‘ना नफा’ तत्त्वावर पुरवठा करण्याचा प्रस्ताव दिला आहे. कंपनीच्या प्रवक्त्यांनी गुरुवारी म्हटले की, फायजरने भारतात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेसाठी आपली लस ‘लाभरहित मूल्या’वर देण्याचा प्रस्ताव दिला आहे. याचाच अर्थ फायजर नफा न कमावता भारताला लस देऊ इच्छित आहे. फायजर कंपनीने म्हटले की, ते याबाबत भारत सरकारशी बोलणी करत आहेत. लसीकरण मोहिमेसाठी लस उपलब्ध करण्यास आम्ही प्रतिबद्ध आहोत.
यादरम्यान कंपनीच्या प्रवक्त्यांनी भारतात अमेरिकी लसीच्या किमतीवर आलेल्या एका रिपोर्टला फेटाळून लावले, ज्यात दावा करण्यात आला होता की, फायजरने भारतात आपल्या लसीचे दर निश्चित केलेले आहेत. कंपनीने म्हटले की, त्यांनी जगभरातील लोकांसाठी आपली लस समान आणि स्वस्त दरात देण्याच्या दिशेने काम केले आहे. वेगवेगळ्या देशांच्या हिशेबाने लसीचे दर निश्चित केले आहेत.
कंपनीने म्हटले की, “जगभरात सुरू असलेल्या कोरोना महामारीच्या प्रकोपादरम्यान फायजरला वाटतेय की, त्यांचे प्राधान्य केवळ लसीच्या माध्यमातून सरकारला त्यांच्या लसीकरण मोहिमांमध्ये समर्थन देणे आहे. भारताबाबतही आमची तीच भूमिका आहे.”
दरम्यान, देशात लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी सरकारने मागच्या आठवड्यात Moderna, फायजर आणि Johnson & Johnson ने विकसित केलेल्या लसींना भारतात वापरावर मंजुरी देण्यावर चर्चा केली आहे. तथापि, भारतात भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि सीरमच्या कोव्हिशील्ड लसीचा वापर सुरू आहे. एवढेच नाही, तर या लसींची परदेशातही निर्यात करण्यात आलेली आहे.
pfizer Vaccine offered on Non profit to supply in India amid corona crisis
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदींनी रद्द केल्या उद्या होणाऱ्या बंगालमधील सर्व सभा, कोरोना परिस्थितीवर घेणार उच्चस्तरीय बैठक
- अनास्थेचा परिणाम : जानेवारीतच केंद्राने कोरोना लाटेचा राज्यांना दिला होता इशारा, दुर्लक्षामुळे महामारीचा झाला उद्रेक
- ‘जिथे कमी तिथे आम्ही’ : ऑक्सिजनसाठी कॉर्पोरेट- सरकारी कंपन्यांचा पुढाकार, टाटा-रिलायन्ससह अनेक कंपन्या मैदानात
- ‘या पापी समाजाचा भाग असल्याची लाज वाटते’ म्हणत न्यायालयानेदेखील महाराष्ट्र सरकारपुढे टेकले हात
- पाकिस्तानात चिनी राजदूत थांबलेल्या हॉटेलमध्ये तेहरिक ए तालिबानकडून बॉम्बस्फोट, ४ जण ठार, १२ जखमी