• Download App
    दहशतवादी संघटनांमध्ये उच्चशिक्षित मुस्लिमांच्या भरतीचा पीएफआयचा कावा; ११ जणांविरूद्ध आरोपपत्र; वकीलही अटकेत PFI's plan to recruit highly educated Muslims into militant organizations

    दहशतवादी संघटनांमध्ये उच्चशिक्षित मुस्लिमांच्या भरतीचा पीएफआयचा कावा; ११ जणांविरूद्ध आरोपपत्र; वकीलही अटकेत

    वृत्तसंस्था

    हैदराबाद : दक्षिण भारतातील विविध शहरांमध्ये योग शिक्षणाच्या नावाखाली दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करून त्यामध्ये उच्चशिक्षित मुस्लिम तरूणांची भरती करण्याचा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआय या बंदी घातलेल्या संघटनेचा कावा होता. संघटनेने दक्षिण भारतातील अनेक शहरांमध्ये तशी भरती देखील केली आहे. याचा पर्दाफाश राष्ट्रीय तपास संस्थेने केला आहे. नुकत्याच घातलेल्या 56 ठिकाणांवरच्या छाप्यांमधून हा खुलासा झाला आहे. PFI’s plan to recruit highly educated Muslims into militant organizations

    पीएफआय सह अन्य दहशतवादी संघटनांमध्ये उच्च शिक्षित मुस्लिम तरुणांची भरती केल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयए (NIA) ने प्रतिबंधित पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) तेलंगणातील 11 सदस्यांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्र दाखल करण्यात आलेल्यांमध्ये दहा जण तेलंगणातील असून, एक आरोपी आंध्र प्रदेशातील आहे. हैदराबाद येथील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले.



    काय आहे प्रकरण? 

    तेलंगणाच्या निझामाबाद जिल्ह्यातील व्हीआय टाऊन पोलिस ठाण्यात हे प्रकरण 4 जुलै रोजी सुरुवातीला दाखल करण्यात आले होते. त्यानंतर एनआयएने 26 ऑगस्ट रोजी नव्याने गुन्हे दाखल केले होते. आरोपी मुस्लिम तरुणांना कट्टरपंथी बनवत होते आणि भारत सरकार तसेच इतर संस्था आणि व्यक्तींविरुद्ध द्वेष आणि विषाने भरलेल्या भाषणाद्वारे त्यांना पीएफआयमध्ये भरती करीत होते, असे तपासात समोर आले असल्याची माहिती एनआयएच्या प्रवक्त्याने दिली. .

    पीएफआयमध्ये भरती केल्यानंतर उच्चशिक्षित मुस्लिम तरुणांना पीएफआयद्वारे आयोजित दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांमध्ये पाठवले जायचे. ही शिबिरे शारीरिक शिक्षण आणि योगासनाच्या वर्गाच्या नावाने चालवली जायची, असे NIA एनआयएच्या अधिकाऱ्याने सांगितले. पीएफआयच्या बेकायदेशीर आणि हिंसक कारवायांच्या प्रकरणात केरळातील एका वकिलाला NIA एनआयएने अटक केली आहे. मोहम्मद मुबारक असे या आरोपीचे नाव असून, तो एर्नाकुलम् जिल्ह्यातील एडवनक्कडचा रहिवासी आहे. या प्रकरणात अटक केलेला तो चौदावा आरोपी आहे.

    PFI’s plan to recruit highly educated Muslims into militant organizations

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!