प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात घातपाती कारवायांसाठी टेरर फंडिंग करणारी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआय कार्यालयांवर राष्ट्रीय तपास यंत्रणेसह राज्यातील पोलिसांनी छापे घातले होते. यानंतर या संघटनेवर केंद्रीय गृहमंत्रालयाने पाच वर्षांसाठी बंदी आणली आहे. आता पीएफआय संदर्भात नवे खुलासे समोर येत आहेत. पीएफआय सदस्यांचे अनेक व्हॉट्सअॅप ग्रुप असून या ग्रुपचा मुख्य अॅडमिन हा पाकिस्तानी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. PFI whatsapp group admin is Pakistani
त्याआधी एनआयए टीमने फुलवारी शरीफ मध्ये छापे घालून गजवा ए हिंदच्या दानिशला अटक केली होती. त्याच्या ग्रुपचा एडमिन पाकिस्तानी असल्याचे आढळून आले आहे.
एटीएसच्या चौकशीत धक्कादायक माहिती
एटीएसने केलेल्या चौकशीत ही माहिती मिळाली असून व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये १७५ सदस्य होते त्यापैकी बरेचजण अफगाणिस्तान आणि युएईचे होते. भारतात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण कट रचल्याचा आरोप यांच्यावर आहे. म्हणूनच पीएफआय आणि त्याच्याशी संलग्न असलेल्या संघटनांवर पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. एनआयए, महाराष्ट्र एटीएस आणि ईडीने ही मोठी देशव्यापी कारवाई केली आहे.
पीएफआयशी संबंधित असलेल्या पाच जणांना महाराष्ट्र एटीएसने मालेगाव, कोल्हापूर, बीड आणि पुणे येथून अटक केली. अधिकाऱ्यांनी या पाच जणांचे फोन, कॉम्प्युटर, हार्ड डिस्क, लॅपटॉप आणि त्यांची बॅंकेची कागदपत्रे जप्त केली. हे सदस्य बंदी घालण्यात आलेल्या सिमी संघटनेप्रमाणे काम करत होते.
PFI whatsapp group admin is Pakistani
महत्वाच्या बातम्या
- मोदी सरकारची दिवाळी भेट : आज पीएम किसान सन्मान निधीचे 16000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा!!
- संभाजीनगर + नाशिकच्या कंपन्यांमधील 1060 जागांसाठी आजपासून रोजगार मेळावा; व्हा ऑनलाईन सहभागी
- अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध??; महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीच्या “अशाही” आठवणी!
- राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर : साम्य काय??, भेद काय??