वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशात घातपाती कारवायांसाठी टेरर फंडिंग करणारी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने PFI पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 12 जुलै 2022 च्या पाटण्यातील रॅलीत घातपात करण्याचा कट रचला होता. त्याचबरोबर PFI चे म्होरके उत्तर प्रदेशमधील संवेदनशील ठिकाणांवर दहशतवादी मॉड्यूलसह हल्ला करण्याच्या तयारीत होते, असा धक्कादायक खुलासा सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने केला आहे. PFI conspiracy to attack Prime Minister Modi’s Patna rally
ईडीचा खुलासा
- इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, पंतप्रधान मोदींच्या पाटणा दौऱ्यावर घातपात घडविण्याच्या उद्देशाने काही युवकांना ट्रेनिंग देण्यासाठी PFI ने ट्रेनिंग कॅम्पही स्थापित केला होता. २०१३ मध्ये सुद्धा इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी त्यांच्या रॅलीमध्ये स्फोट घडवला होता. PFI ची त्यांना त्यावेळी साथ होती. PFI सदस्य शफिक पायेथच्या विरोधातील रिमांड नोटमध्ये ईडीने हा खुलासा केला आहे. शफिकला केरळमधून अटक केली आहे.
- PFI ने निवडक अरब देशांमधून निधी जमा केला आणि इतर माध्यमातून भारतात पाठवला.
- PFI संघटनेचे इतर सदस्य, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या खात्यांमध्ये अरब देशातून निधी पाठवण्यात आला.
- ईडी आणि राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) सहकार्याने देशातील सुमारे १३ राज्यांमध्ये छापे घातले. यावेळी एनआयएने 106 हून अधिक कार्यकर्त्यांना अटक केली, तर ईडीने चार जणांना ताब्यात घेतले आहे.
- या सगळ्यांचा तपास आणि चौकशी वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरू असून त्यांच्याकडून एकापाठोपाठ एक महत्त्वाचे धक्कादायक खुलासे होत आहेत. विविध षडयंत्र खुली होत आहेत. मात्र, त्यावर अद्याप एनआयए आणि ईडी यांचे अधिकारी अधिकृतपणे तपशीलवार बोललेले नाहीत.
PFI conspiracy to attack Prime Minister Modi’s Patna rally
महत्वाच्या बातम्या
- India Forex Reserve : परकीय चलनसाठा 5.22 अब्जांच्या घसरणीसह दोन वर्षांच्या नीचांकी पातळीवर
- New Telecom Bill : व्हॉट्सअॅप कॉलसाठीही द्यावे लागणार पैसे, सरकारने मागितल्या लोकांकडून सूचना, जाणून घ्या काय आहे नवीन दूरसंचार विधेयकात?
- दसरा मेळावा : शिवसेनेचे दोन गटांमध्ये झुंज; मित्र पक्षांच्या गोटात ताकदीच्या घटी-वाढीचा आनंद!!
- ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवतीर्थावर!; पहिली फेरी जिंकली, पण पुढे काय?