विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: रोज वाढणाºया पेट्रोल व डिझेल दरामुळे नागरिकांमध्ये नाराजी असताना, ‘आपल्याकडे पेट्रोलदरात झालेली वाढ फक्त पाच टक्केच आहे, काही विकसित देशांत तर ५० टक्के वाढ झाली आहे असे पेट्रोलियममंत्री हरदिपसिंग पुरी यांनी स्पष्ट केलेआहे.Petrol prices hiked by 50 per cent in US, UK, only 5 per cent in India, Petroleum Minister
युक्रेनमधील स्थितीवर लोकसभेत अल्पकालीन चर्चा सुरू असताना त्या दरम्यान देशातील इंधन दरवाढीचा मुद्दा उपस्थित झाला. ‘रशिया-युक्रेन युद्धाचा फटका फक्त भारतालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला बसला आहे. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, जर्मनी, श्रीलंका आदी देशांमध्ये पेट्रोल जवळपास ५० टक्क्यांनी महाग झाले आहे.
आपल्याकडे ते केवळ पाच टक्केच महागले आहे’, असे पुरी यांनी आकडेवारी देत नमूद केले.युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या ‘ऑपरेशन गंगा’साठी युक्रेनलगतच्या देशांमध्ये काही केंद्रीय मंत्र्यांना पाठवण्यात आले होते; त्यात पुरी यांचा समावेश होता. ‘ही मोहीम अतिशय प्रभावीरित्या राबवण्यात आली’, असे पुरी यावेळी म्हणाले.