• Download App
    पेट्रोलचे भाव केंद्र सरकार नाही तर अमेरिका ठरवते, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा दावाPetrol price is not decided by the central government but by the US, claims Union Minister of State Raosaheb Danve

    पेट्रोलचे भाव केंद्र सरकार नाही तर अमेरिका ठरवते, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा दावा

    महाराष्ट्रात राज्यकर्ते पेट्रोल दरवाढीच्या विरोधात आंदोलन करतात, पण पेट्रोलचे भाव केंद्र सरकार नाही तर अमेरिका ठरवते, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.Petrol price is not decided by the central government but by the US, claims Union Minister of State Raosaheb Danve


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रात राज्यकर्ते पेट्रोल दरवाढीच्या विरोधात आंदोलन करतात, पण पेट्रोलचे भाव केंद्र सरकार नाही तर अमेरिका ठरवते, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.

    देशातील इंधनाच्या वाढत्या किंमतीवरून आणि महागाईवरून रविवारी काँग्रेसने मोर्चा काढला. त्यावर प्रतिक्रिया देताना रावसाहेब दानवे म्हणाले, देशात आणि राज्यात पेट्रोलच्या किंमती वाढत आहेत, पण आपण यावर काही बोलणे योग्य नाही. पेट्रोलचे दर हे आता जागतिक बाजाराशी लिंक केलेले आहेत.


    रावसाहेब दानवे म्हणाले, उद्धवजींनी पत्र द्यावं, आम्ही लगेच मुंबई लोकल सर्वांसाठी सुरू करतो


    त्यामुळे या किंमती वाढण्यामागे केंद्र सरकारचा कोणत्याही प्रकारचा हात नाही. पेट्रोल-डिझेलच्या किंमती या रोज खाली-वर होतात. या किंमती आता अमेरिकेत ठरवल्या जातात. त्यामुळे केंद्र सरकारला यावरून दोष देणे हे चुकीचे आहे. केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी झाल्या आहेत. पण राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार व्हॅट कमी करत नाहीत, त्यामुळे किंमती वाढलेल्या आहेत.

    Petrol price is not decided by the central government but by the US, claims Union Minister of State Raosaheb Danve

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार