• Download App
    Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या दराचा पुन्हा भडका, अनेक शहरांत शंभरी पार! । Petrol Diesel Price Today Know About Petrol Diesel Rate On 16th May 2021 in your City

    Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या दराचा पुन्हा भडका, अनेक शहरांत १०० रुपयांच्या पुढे!

    Petrol Diesel Price Today : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये शनिवारी थोडा दिलासा मिळाला होता, परंतु रविवारी पुन्हा दरवाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाल्याने अनेक शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी पार केली आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोलमध्ये 24 पैसे प्रति लीटर आणि डिझेलमध्ये 27 पैसे प्रति लीटरची वाढ केली आहे. Petrol Diesel Price Today Know About Petrol Diesel Rate On 16th May 2021 in your City


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये शनिवारी थोडा दिलासा मिळाला होता, परंतु रविवारी पुन्हा दरवाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाल्याने अनेक शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी पार केली आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोलमध्ये 24 पैसे प्रति लीटर आणि डिझेलमध्ये 27 पैसे प्रति लीटरची वाढ केली आहे.

    देशातील चार महानगरांमधील दर

    इंडियन ऑइल (Indian Oil)च्या वेबसाइटनुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये 16 मे 2021 रोजी एक लीटर पेट्रोलचे दर वाढून 92.58 रुपये आणि डिझेलचे दर 83.22 रुपये झाले. याचप्रमाणे मुंबईत पेट्रोल (Petrol price in Mumbai) 98.88 रुपये आणि डिझेल 90.46 रुपये, कोलकात्यात पेट्रोल 92.67 रुपये आणि डिझेल 86.06 रुपये, चेन्नईत पेट्रोल 94.34, तर डिझेल 88.09 रुपये झाले आहे.

    कसे ठरतात पेट्रोल आणि डिझेलचे दर

    पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोजी सकाळी 6 वाजता बदलतात. पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये एक्साइज ड्यूटी, डीलर कमिशन आणि इतर बाबी जोडल्यानंतर याची किंमत दुप्पट होते. परकीय चलनातील दरांसोबत आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूडच्या दरांवर दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो.

    आपल्या शहरातील पेट्रोल- डिझेलचे दर असे घ्या जाणून

    आपल्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे सध्याचे दर जाणून घेणे सोपे आहे. यासाठी तुम्हाला एक एसएमस करावा लागेल. इंडियन ऑइलचे ग्राहक दिल्लीतील दर जाणून घेण्यासाठी मेसेज बॉक्समध्ये RSP 102072 म्हणजेच RSP <space> पेट्रोल पंपचा डीलर कोड टाकावा आणि तो मेसेज 9224992249 या क्रमांकावर पाठवावा. याचप्रमाणे मुंबईसाठी RSP 108412, कोलकात्यासाठी RSP 119941 आणि चेन्नईसाठी RSP 133593 टाइप करून ते 9224992249 क्रमांकावर पाठवा. असे केल्यास तुम्हाला तुमच्या मोबाइलवर ताजे रेट मिळतील. याच प्रमाणे इतर शहरांतील कोड टाकून तुम्ही बदललेले दर आपल्या मोबाइलवर जाणून घेऊ शकता.

    Petrol Diesel Price Today Know About Petrol Diesel Rate On 16th May 2021 in your City

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Pink e rickshaw महिलांसाठी महिलांद्वारे संचालित ‘पिंक ई-रिक्षा’!