• Download App
    लोकसभा निवडणुकीत महागाईच्या नावाने बोंबाबोंब; पण कर्नाटकात काँग्रेसच्या राज्यात पेट्रोल - डिझेलची दरवाढ!! Petrol-diesel price hike in Congress state of Karnataka

    लोकसभा निवडणुकीत महागाईच्या नावाने बोंबाबोंब; पण कर्नाटकात काँग्रेसच्या राज्यात पेट्रोल – डिझेलची दरवाढ!!

    विशेष प्रतिनिधी

    बेंगलुरु : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांनी महागाई आणि बेरोजगारी वगैरे मुद्द्यांवर जोरदार बोंबाबोंब ठोकली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे नेते महागाई आणि बेरोजगारी सारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष हटवण्यासाठी धार्मिक वाद निर्माण करत असल्याचा आरोप राहुल गांधी आणि बाकीच्या काँग्रेस नेत्यांनी सातत्याने केला. Petrol-diesel price hike in Congress state of Karnataka

    पण लोकसभा निवडणूक झाल्यानंतर मात्र याच राहुल गांधींच्या काँग्रेसच्या कर्नाटक मधल्या सरकारने राज्यात पेट्रोल आणि डिझेलची महागाई करून टाकली. काँग्रेस सरकारने कर्नाटक सेल्स टॅक्स मध्ये वाढ केली त्यानुसार पेट्रोलवर 29.84% कर वाढवला, तर डिझेलवर तोच कर 14.8% वाढवला. त्यामुळे पेट्रोलच्या दरात 3.00 रुपयांनी, तर डिझेलच्या दरात 3.20 रुपयांनी वाढ झाली.

    कर्नाटकात काँग्रेसने सत्तेवर येताना भरपूर गोष्टी फुकट वाटण्याचे आश्वासने दिली होती. ती आश्वासने पहिल्या तीन महिन्यांमध्येच फेल गेली. सरकारने आपल्याकडे निधी नसल्याची बोंबाबोंब सुरू करत केंद्र सरकारकडे बोटे दाखवली. आता स्वतःच्याच वस्तू फुकट वाटण्याच्या आश्वासनाच्या जाळ्यात अडकलेल्या काँग्रेस सरकारने तिथे पेट्रोल – डिझेलची भरमसाठ दरवाढ करून त्याचा कर फुकट वाटण्याच्या कामी वापरण्याचा इरादा व्यक्त केला आहे. या मुद्द्यावर राहुल गांधी किंवा बाकी कुठल्याही काँग्रेस नेत्यांनी तोंड उघडलेले नाही.

    भाजपने मात्र कर्नाटक मध्ये रस्त्यावर आणि इतरत्र सोशल मीडियावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढी विरोधात आवाज उठवला आहे.

    Petrol-diesel price hike in Congress state of Karnataka

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Goldie Brar : गोल्डी ब्रारने भाजपचे माजी खासदाराकडे मागितला पाच कोटींचा प्रोटेक्शन मनी

    UPI transactions : दोन हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर GST लादण्याची कोणतीही योजना नाही

    Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांनी बंगाल पोलिसांना म्हटले ‘मूक प्रेक्षक’