• Download App
    दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेली व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह, ओमिक्रॉन व्हेरिएंटची तपासणी सुरूPerson who came to Pune from South Africa found Corona positive, suspected Omicron variant 

    ओमिक्रॉन : दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेली व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह, ओमिक्रॉन व्हेरिएंटची तपासणी सुरू

     

    कोरोनाच्या डेल्टा प्रकारानंतर आता अवघ्या जगाने ओमिक्रॉन व्हेरिएंटची धसकी घेतली आहे. आफ्रिकी देशांत आढळलेल्या या व्हेरिएंटने आतापर्यंत 15 देशांमध्ये शिरकाव केला आहे. यामुळे भारतात आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांवरही करडी नजर ठेवण्यात येत आहे. आता मात्र आफ्रिकेतून पुण्यात आलेली एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. यामुळे पुणे महापालिकेच्या चिंतेत भर पडली आहे.Person who came to Pune from South Africa found Corona positive, suspected Omicron variant 


    प्रतिनिधी

    पुणे : कोरोनाच्या डेल्टा प्रकारानंतर आता अवघ्या जगाने ओमिक्रॉन व्हेरिएंटची धसकी घेतली आहे. आफ्रिकी देशांत आढळलेल्या या व्हेरिएंटने आतापर्यंत 15 देशांमध्ये शिरकाव केला आहे. यामुळे भारतात आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांवरही करडी नजर ठेवण्यात येत आहे. आता मात्र आफ्रिकेतून पुण्यात आलेली एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. यामुळे पुणे महापालिकेच्या चिंतेत भर पडली आहे.


    ओमिक्रॉनचा धोका : सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली, लस असूनही कोरोना चाचणी अनिवार्य


    सध्या महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आलेली आहे. बाधितांची संख्याही रोडवलेली आहे. तत्पूर्वी, सर्वच जिल्ह्यांत आरोग्य यंत्रणांना अविश्रांत मेहनत घ्यावी लागली. परंतु आता आफ्रिकेतून आलेली व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळल्याने चिंता वाढली आहे. सध्या त्या बाधिताची आणखी तपासणी सुरू आहे.

    बाधित असलेली ही व्यक्ती काही दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आली होती. त्यानंतर या व्यक्तीची चाचणी केली असता पॉझिटिव्ह आढळली आहे. परंतु, या व्यक्तीला ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झाली आहे की नाही, याची तपासणी केली जात आहे. बाधित व्यक्ती होम क्वारंटाईन असल्याचे कळते.

    Person who came to Pune from South Africa found Corona positive, suspected Omicron variant

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!