• Download App
    कोरोनातून बरे झाल्यानंतर लस घेण्यासाठी आता 9 महिने प्रतीक्षा करावी लागणार ? Person Recovered From Corona will get vaccine After Nine months

    Corona Vaccine New Rule : कोरोनातून बरे झाल्यानंतर लस घेण्यासाठी आता 9 महिने प्रतीक्षा करावी लागणार ?

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : जर एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला आणि तो बरा झाला. त्यानंतर नऊ महिन्यांनी तो लस घेण्यास पात्र असेल, असा नवा नियम येणार आहे. Person Recovered From Corona will get vaccine After Nine months

    नॅशनल ग्रुप ऑन व्हॅक्सिन अॅडमिनिस्ट्रेशन (NEGVAC) लवकरच याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर लसीकरण सहा महिन्यांनी करावे, असे नुकतेच सांगितले होते. मात्र, आता ते 9 महिन्यांनी करण्याची शक्यता आहे.



    अनेक गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर तज्ज्ञांच्या टीमनं हा सल्ला दिला. भारतात कोरोनाच्या पहिल्या लाटेत रिइन्फेक्शनचा रेट 4.5 टक्के होता. यादरम्यान 102 दिवसांचं अंतर पाहायला मिळत होतं. कोरोनाची लागण झाल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत याविरोधात प्रतिकारशक्ती राहू शकते, असे काही देशांतील संशोधनातून पुढे आले. सध्या कोरोनाच्या प्रसार सुरुच असल्यानं रिइन्फेन्शनचा धोका कायम आहे. अशात एखाद्याला पहिल्या डोसनंतर दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षा करावी लागत असेल तर हे फायद्याचंही ठरु शकतं.

    लसीकरणाच्या नियमांनुसार, कोरोना लसीच्या दुसऱ्या डोससाठी 12 ते 16 आठवड्यांची प्रतीक्षा करावी लागेल. कोविन पोर्टलवरही दुसऱ्या डोससाठीचा पर्याय 84 दिवसांनंतच आहे. तर, कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींना पहिले सहा महिने लस घेता येणार नव्हती. मात्र, आता हा काळ वाढवून 9 महिने केला जाऊ शकतो. तर, गर्भवती महिलांकडे डिलेव्हरीनंतर लस घेण्याचा पर्याय आहे.

    Person Recovered From Corona will get vaccine After Nine months

    हत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट