वृत्तसंस्था
मुंबई : कोकणच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळास अखेर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) प्रवासी वाहतुकीला परवानगी दिली. त्यामुळे मुंबई- सिंधुदुर्ग- मुंबई विमान प्रवासाचा मार्ग मोकळा झाला.Permission For Passenger Transport From Chipi Airport of Sindhudurg District
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील चिपी येथे आयआरबी सिंधुदुर्ग एअरपोर्ट प्रा.लि. कंपनीने सुमारे ८०० कोटी रुपये खर्चून विकसित केलेला हा पहिला ग्रीनफील्ड विमानतळ आहे. या विमानतळाचे आधी उद्घाटन झाले आहे. मात्र, विमानांचे उड्डाण झाले नव्हते.
काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ९ ऑक्टोबरला या विमानतळाच्या उद्घाटनचा नवा मुहूर्त जाहीर केला होता. दुसरीकडे राज्य सरकारनेही स्वतंत्रपणे उद्घाटन समारंभाची घोषणा केली होती. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रित करण्याची गरज नाही, अशी भूमिका घेतल्यावर राज्य सरकारने राणे यांना प्रमुख पाहुण्यांच्या यादीतून वगळले.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने या विमानतळावरून विमान उड्डाणास परवानगी दिली. त्यामुळे प्रवासी विमान उड्डाणे सुरू करण्याचाही कंपनीचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच या प्रकल्पातील मोठा अडथळा पार झाला, असे आयआरबीचे व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र म्हैसकर यांनी सांगितले.करारानुसार ९० वर्षे हे विमानतळ आयआरबी कंपनीच्या ताब्यात राहणार आहे.
विमानतळाचा कोंकणाला फायदा
- कोकण आता मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र, दक्षिणेकडील राज्ये तसेच देशाच्या अन्य भागांशीही हवाई मार्गाने जोडले जाणार आहे.
- प्रवासी तसेच मालवाहतुकीला चालना मिळणार आहे.
- २५०० रुपयांत मुंबई- सिंधुदुर्ग, असा एकेरी विमान प्रवास करता येणार आहे.
- प्रवासासाठी लागणार वेळ वाचणार आहे
- विमान सेवा सुरु झाल्याने पर्यटनाला मोठी चालना
- उद्योक, व्यापाराला अधिक चालना मिळणार
Permission For Passenger Transport From Chipi Airport of Sindhudurg District
महत्त्वाच्या बातम्या
- इस्लामिक स्टेट भारतात हातपाय पसरण्याचा करतेय प्रयत्न, आत्तापर्यंत १६८ जणांना एनआयएकडून अटक
- लसीकरण ऑलिम्पिक असती तर आम्ही विश्वविक्रमासह सुवर्णपदक जिंकले असते, आनंद महिंद्रा यांनी केले कौतुक
- राष्ट्रवादीचा माजी जिल्हा परिषद पदाधिकारी मंगलदास बांदलला अटक, शिवाजीराव भोसले सहकारी बॅँक घोटाळा
- मुंबईच्या सराफाचे तब्बल सव्वा कोटींचे 3 किलो सोने लंपास