वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतीय लष्कराच्या इतिहासात आज एक महत्वपूर्ण दमदार ऐतिहासिक पाऊल टाकण्यात आले आहे. भारतीय लष्कराने प्रथमच आपल्या सेवेतील 39 महिला अधिकाऱ्यांना पर्मनंट कमिशन प्रदान केले आहे. Permanent commission for the first time to 39 women officers of Indian Army
भारतीय लष्कराच्या अधिकृत पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. महिलांना भारतीय सैन्यदल सेवेत पुरुषांच्या बरोबरीने स्थान देण्यात यावे. त्यांच्या प्रशिक्षणापासून ते सेवाकार्याच्या अटी-शर्ती पर्यंत समानता असावी, असे आदेश सुप्रीम कोर्टाने नुकतेच दिले आहेत. त्यानुसार केंद्रातल्या मोदी सरकारने महिलांना भारतीय सैन्यदलांमध्ये समान सेवेची संधी देण्याबाबत काही धोरणात्मक निर्णय घेतले आहेत.
त्यापैकीच महिला अधिकाऱ्यांना भारतीय सैन्य दलात मध्ये परमनंट कमिशन देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करताना भारतीय लष्कराने आज आपल्या सेवेतील 39 महिला अधिकाऱ्यांना पर्मनंट कमिशन प्रदान केले आहे.
आजच्याच ऐतिहासिक दिनी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएच्या पासिंग आऊट परेडचे निरीक्षण केले. त्या वेळी बोलताना जनरल नरवणे म्हणाले, की आज मी ज्या पोडियमवर उभा आहे आणि ज्या पदावर कार्यरत आहे, त्याच पदावर येत्या चाळीस वर्षांमध्ये आपल्याला एक भारतीय महिला उभी असलेली दिसेल आणि माझ्या पदावर कार्यरत असलेली दिसेल.
याचा अर्थ भारतीय लष्कर प्रमुखपदी सुद्धा महिलेची नियुक्ती होऊ शकते, असेच जनरल नरवणे यांनी आज सूचित केले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने पहिले पाऊल टाकत 39 महिला अधिकाऱ्यांना परमनंट कमिशन प्रदान केले आहे.
Permanent commission for the first time to 39 women officers of Indian Army
महत्त्वाच्या बातम्या