वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी सेंट्रल विस्टा प्रोजेक्टवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बऱ्याच दिवसांनी भाष्य केले आहे. डिफेन्स ऑफिसर्स कॉम्प्लेक्सच्या उद्घाटन सोहळ्यात त्यांनी सेंट्रल विस्टा विषयी महत्वपूर्ण माहिती दिली. तब्बल सात हजार संरक्षण अधिकारी आणि कर्मचारी काम करणाऱ्या डिफेन्स ऑफिसर्स कॉम्प्लेक्सचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. People who were after Central Vista Project would be conveniently quiet on this, which is also part of Centra Vista
हे डिफेन्स ऑफिसर्स कॉम्प्लेक्स सेंट्रल विस्टाचा एक अत्यंत महत्वपूर्ण भाग आहे. परंतु जे विरोधक सेंट्रल विस्टाच्या मागे लाठी घेऊन लागले होते, ते चलाखीने डिफेन्स ऑफिसर्स कॉम्प्लेक्स बद्दल गप्प बसत होते. कारण त्यांना माहिती होते, की आपले खोटे बोलणे यानिमित्ताने उघड्यावर येणार आहे. तब्बल सात हजार संरक्षण अधिकारी, कर्मचारी काम करणाऱ्या या कॉम्प्लेक्स मधून संरक्षण विषयक रचनेची अत्यंत महत्त्वपूर्ण कामगिरी होणार आहे. हे विरोधकांनी लपविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आज संपूर्ण देश सेंट्रल विस्टा मागची व्यापक दृष्टी आणि विचार बघतो आहे, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा समाचार घेतला.
सेंट्रल विस्टाचे काम वेगात सुरू आहे. नव्या संसद भवनाचे काम नियोजित वेळेत पूर्ण होईल. डिफेन्स ऑफिसर्स कॉम्प्लेक्सचे काम 24 महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु ते बारा महिन्यातच पूर्ण झाले आणि आज त्याचे उद्घाटन होत आहे, अशी माहिती पंतप्रधान मोदींनी दिली.
देशाच्या संरक्षण क्षेत्रात मोठी झेप घेण्यासाठी ज्या आवश्यक पायाभूत सुविधा आहेत त्यापैकी डिफेन्स ऑफिसर्स कॉम्प्लेक्स अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. येथून संरक्षण दलाच्या तीनही विभागांचे महत्त्वाचे काम चालेल. कस्तुरबा गांधी मार्गावर आफ्रिका एरियामध्ये हे डिफेन्स ऑफिसर्स कॉम्प्लेक्स बांधण्यात आले आहे.
People who were after Central Vista Project would be conveniently quiet on this, which is also part of Centra Vista
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजवटीतअल्पसंख्यांक शंभर टक्के सुरक्षित, द्वेषाच्या घटना वाढल्याचा आरोप चुकीचा, राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष इक्बाल सिंह लालपुरा यांचा निर्वाळा
- महामार्गावरील सुसाट वेगाला आवर, वेग मर्यादा १२० किलोमीटरपर्यंत वाढविण्याच्या केंद्राच्या सूचनेला मद्रास उच्च न्यायालयाची स्थगिती
- भवानीपूरमध्ये सोला अना मशीदीचा आशिर्वाद घेऊन ममता बॅनर्जी यांची प्रचाराला सुरूवात, भाजपने केला घाम फुटल्याचा आरोप
- वीज बिल थकबाकी वसुलीसाठी डाव, सरकारला सावकारी वसुली करायचीय, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप