वृत्तसंस्था
हैदराबाद – कोरोना वाढता फैलाव रोखण्यासाठी तेलंगणात सर्वत्र १० दिवसांचे कडक निर्बंध असताना हैदराबादमध्ये उद्याच्या ईदच्या खरेदीसाठी चारमिनार या भर गर्दीच्या परिसरात झुंबड पाहायला मिळाली. एकीकडे कोरोनाग्रस्तांचे कुटुंबीय हॉस्पिटलच्या एकेका बेडसाठी अक्षरशः जीवाचे रान करीत आहेत. हजारो लोक ऑक्सिजनअभावी मरणाच्या दारात जात आहेत. त्याचवेळी हैदराबादसारख्या सायबर सिटीत कोरोनाविषयक अनास्थेने कळस गाठला आहे. People throng markets near Hyderabad’s Charminar area ahead of Eid tomorrow
हैदराबादेत कोरोना प्रतिबंधक नियमावली अक्षरशः पायदळी तुडविण्यात आली आहे. चारमिनार परिसर एरवीदेखील प्रचंड गर्दीचा मानला जातो. तेलंगण सरकारने कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेऊन त्याची साखळी तोडण्यासाठी राज्यात कठोर निर्बंध लागू केले आहेत. यात ईदसह सर्व धार्मिक सण सामूहिक स्वरूपात न करता वैयक्तिक स्वरूपात आणि गर्दी टाळून करावेत, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
मात्र, या निर्बंधांचा ईदची खरेदी करणाऱ्या लोकांवर आणि विक्रेत्यांवर काहीही फरक पडलेला दिसत नाही. चारमिनार परिसरात स्त्री – पुरूष मुक्तपणे खरेदी करत फिरताना दिसत आहेत. यापैकी अनेकांच्या तोंडावर मास्क नाहीत. अनेकांच्या तोंडावर नावापुरते मास्क आहेत. सोशल डिस्टसिंगचा तर पत्ताच नसल्याचे दिसते आहे. हैदराबादच्या या प्रचंड गर्दीचा एक विडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विटरवर शेअर केला आहे. यातून लोकांची कोरोनाविषयक अनास्थाच दिसून येते आहे.
People throng markets near Hyderabad’s Charminar area ahead of Eid tomorrow
महत्त्वाच्या बातम्या
- Project Heal India : किरण खेर आजारी असुनही अनुपम खेर यांचा मदतीसाठी पुढाकार ; वैद्यकीय उपकरणांची पहिली खेप अमेरिकेतून दाखल
- सोनियांसह १२ नेत्यांचा मोदींच्या दिशेने “पत्रबाण”; ज्या केंद्रावर टीकास्त्र त्याच्याचकडे नऊ कलमी मागण्याही… पण पत्राचे खरे रहस्य काय??
- कोरोना संक्रमणातही भारताच्या औद्योगिक उत्पादनांची गरुडभरारी ; 22.4 टक्के वाढ
- महाराष्ट्राने १८ ते ४५ वयोगटाचे लसीकरण थांबविले; लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढविण्याची राज्य मंत्रिमंडळाची शिफारस
- उरळी कंचनला चोरीच्या कारमधून पेट्रोल पंपावर दरोड्याचा प्रयत्न; चार जणांच्या टोळीला अटक