वृत्तसंस्था
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर होण्याच्या आजच्या पहिल्या दिवशीच निवडणूक आयोगाला काही पक्षांनी घेरायला सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाने 15 जानेवारीपर्यंत राजकीय पक्षांचे मेळावे, रॅली यांच्यावर बंधने घातली आहेत. त्यावर थेट “चिडून” बोलता येत नाही म्हणून “आडून” बोलण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांनी चालवला आहे. People in Uttar Pradesh are set to bid farewell to the BJP government.
निवडणुकीची आचारसंहिता समाजवादी पक्ष म्हणून आम्ही पाळू. परंतु निवडणूक आयोगाने सत्ताधारी भाजपही निवडणूक आचारसंहिता पाळेल, याची खात्री करून घ्यावी, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केले आहे.
त्याच वेळी काँग्रेसचे नेते खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी आधीच निवडणूक दौरे करून घेतले आहेत. त्यांना निवडणूक प्रचाराचा प्रश्न नाही पण गरीब पक्षांच्या प्रचाराला मोठा अडथळा येत आहे, अशा शब्दांमध्ये निवडणूक आयोगावर टीकास्त्र सोडले आहे.
इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन, व्हीव्हीपॅट त्याचबरोबर निवडणूक आचारसंहिता या मुद्द्यांवरून कोणत्याही राज्यातल्या विरोधी पक्ष निवडणूक आयोगावर नेहमीच निशाणा साधत असतो. पण ही निशाणा साधण्याची वेळ साधारणपणे निकालानंतर येत असते. यावेळी मात्र समाजवादी पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आज पाच राज्यांची निवडणूक जाहीर होण्याच्या दिवसापासून निवडणूक आयोगाला घेरायला सुरुवात केली आहे.
त्यांचा मुख्य निशाणा भाजपवर आहे पण निवडणूक आयोगाचा खांदा वापरून किंवा भाजपचा खांदा वापरून ते दोन्ही घटकांवर बाण सोडताना दिसत आहेत.
People in Uttar Pradesh are set to bid farewell to the BJP government.
महत्त्वाच्या बातम्या
- UP Assembly Election : उत्तर प्रदेशात 10 फेब्रुवारी ते 7 मार्च असे सात टप्प्यांत होणार मतदान, वाचा सविस्तर…
- Assembly Election २०२२ Date : पाच राज्यांमध्ये निवडणूकीची घोषणा, १० मार्चला निकाल, यूपी-पंजाब-उत्तराखंड-गोवा आणि मणिपूरमध्ये कधी होणार मतदान? वाचा सविस्तर…
- दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांना कोरोनाची लागण , ट्विट करून दिली माहिती