• Download App
    DMK नेत्याची हिंदी भाषकांविरुद्ध गरळ; उत्तर प्रदेश, बिहार मधले लोक तामिळनाडूत येऊन टॉयलेट साफ करतात!! People from Uttar Pradesh, Bihar come to Tamil Nadu to clean toilets ; dmk leader

    DMK नेत्याची हिंदी भाषकांविरुद्ध गरळ; उत्तर प्रदेश, बिहार मधले लोक तामिळनाडूत येऊन टॉयलेट साफ करतात!!

    विशेष प्रतिनिधी

    चेन्नई : लोकसभा निवडणुकीचे सेमी फायनल भाजपने जिंकली, पण काँग्रेसने दक्षिणेतले तेलंगण राज्य जिंकले. त्यानंतरINDI आघाडीतल्या घटक पक्षांच्या नेत्यांनी भारताचे दक्षिणोत्तर राजकीय विभाजन झाल्याची मुक्ताफळे उधळली होती. People from Uttar Pradesh, Bihar come to Tamil Nadu to clean toilets ; dmk leader

    पण आता INDI आघाडीतलाच एक महत्त्वाचा घटक पक्ष DMK अर्थात द्रविड मुन्नेत्र कळघमच्या एका नेत्याने आपल्या हिंदी द्वेषाची गरळ ओकली आहे. जे इंग्लिश शिकतात, त्यांना आयटीमध्ये चांगले जॉब मिळतात, पण जे फक्त हिंदी शिकतात, त्यांना तामिळनाडूत येऊन बांधकाम कामगारांचे, रस्ते सफाई आणि टॉयलेट सफाईचे काम करावे लागते, अशा उर्मट शब्दांमध्ये DMK नेते माजी केंद्रीय मंत्री खासदार दयानिधी मारन यांनी हिंदी भाषकांचा अपमान केला आहे.

    पण हिंदी भाषकांचा अपमान करणारे दयानिधी मारन हे एकमेव दक्षिण भारतीय नेते नाहीत. याआधी DMK तचेच खासदार सेंथिल कुमार यांनी फक्त गोमूत्र राज्यांमध्ये भाजप जिंकल्याची टीका भर लोकसभेत केली होती. त्यानंतर त्यांना माफी मागावी लागली होती. पण त्याच वेळी तेलंगणाचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी देखील उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांपेक्षा तेलंगणाच्या लोकांचा DNA चांगला असल्याचे अपमानजनक टिप्पणी केली होती.

    मात्र या सगळ्या अपमानजनक टीकेवर काँग्रेस, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, जनता दल युनायटेड, राष्ट्रीय जनता दल या सगळ्यांचे नेते मूग गिळून गप्प बसले आहेत. कारण हे सगळे INDI आघाडीचे घटक पक्ष आहेत.

    People from Uttar Pradesh, Bihar come to Tamil Nadu to clean toilets ; dmk leader

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र