pegasus spying : फोन टॅपिंगच्या वादावरून आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत एक निवेदन दिले आहे. ते म्हणाले की, फोन टॅपिंगद्वारे हेरगिरी करण्याचे आरोप चुकीचे आहेत. लीक झालेल्या डेटाचा हेरगिरीशी काहीही संबंध नाही. अश्विनी वैष्णव म्हणाले की, पाळत ठेवली होती हे डेटावरून सिद्ध होत नाही. लीक झालेल्या डेटाचा हेरगिरीशी काहीही संबंध नव्हता. फोन टॅपिंगबाबतचा सरकारचा प्रोटोकॉल अतिशय कठोर आहे आणि पाळत ठेवली गेली असल्याचे डेटा सिद्ध करत नाही. pegasus spying IT Minister ashwini vaishnaw statement in lok sabha on spying controversy
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : फोन टॅपिंगच्या वादावरून आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत एक निवेदन दिले आहे. ते म्हणाले की, फोन टॅपिंगद्वारे हेरगिरी करण्याचे आरोप चुकीचे आहेत. लीक झालेल्या डेटाचा हेरगिरीशी काहीही संबंध नाही. अश्विनी वैष्णव म्हणाले की, पाळत ठेवली होती हे डेटावरून सिद्ध होत नाही. लीक झालेल्या डेटाचा हेरगिरीशी काहीही संबंध नव्हता. फोन टॅपिंगबाबतचा सरकारचा प्रोटोकॉल अतिशय कठोर आहे आणि पाळत ठेवली गेली असल्याचे डेटा सिद्ध करत नाही.
भारतीय लोकशाहीला बदनाम करण्याची षडयंत्र
आयटी मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, काल रात्री वेब पोर्टलवर खळबळजनक बातमी प्रसिद्ध झाली होती. बातम्यांमध्ये बरेच मोठे आरोप केले गेले. हा अहवाल संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधी आला, तो योगायोग असू शकत नाही. ते म्हणाले की, भारतीय लोकशाहीला बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे. या हेरगिरी घोटाळ्याशी सरकारचा काहीही संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
काय आहे प्रकरण?
गार्डियन वृत्तपत्राने असा दावा केला आहे की, भारत सरकारने बर्याच पत्रकार, राजकारण्यांवर हेरगिरी केली आहे. भारतातील 40 हून अधिक पत्रकारांचे फोन हॅक झाल्याचा दावा केला जात आहे. हे दावे केले गेले आहेत असे सांगून अनेक मोबाईल फोनची फॉरेन्सिक तपासणी केली गेली. द वॉशिंग्टन पोस्ट, द गार्डियन यासह जगातील 17 वृत्तसंस्थांनी ‘द पेगासस प्रोजेक्ट’ नावाची रिपोर्ट प्रकाशित केली आहे, ज्यामध्ये केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील हजारो लोकांचे फोन हॅक केल्याची घटना चव्हाट्यावर आल्या आहेत.
विरोधकांची केंद्राला घेरण्याची तयारी
विरोधी पक्ष हेरगिरी प्रकरणात सरकारकडून जेपीसी चौकशीची मागणी करणार आहेत. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी या घटनेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. आज संसदेच्या दोन्ही सभागृहांत मोठा गदारोळ झाला. त्याचबरोबर शिवसेनेने म्हटले आहे की, महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही फोन टॅप होत आहे.
pegasus spying IT Minister ashwini vaishnaw statement in lok sabha on spying controversy
महत्त्वाच्या बातम्या
- कळव्यात दरड कोसळून 5 जण ठार, ढिगाऱ्याखालून 2 जणांची सुटका, रेस्क्यू ऑपरेशन सुरू
- पाकिस्तानी षडयंत्राचा पर्दाफाश : जिथे भारतीय पत्रकार दानिशची हत्या झाली, तेथे पाकिस्तान आणि तालिबानचे झेंडे एकत्र फडकतात
- पाकिस्तानमध्ये मोठी दुर्घटना : ट्रक-बसच्या धडकेत 30 ठार, 40 हून अधिक जखमी; ईदनिमित्त सर्वजण आपल्या घरी जात होते
- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सरकारने सुरू केली तयारी, जीवनरक्षक औषधांचा एक महिन्याचा स्टॉक करणे सुरू
- WATCH : नवी मुंबईत मुसळधार, खारघरच्या डोंगरात अडकलेल्या 120 जणांचे थरारक रेस्क्यू ऑपरेशन