• Download App
    Pegasus Controversy : अॅम्नेस्टी इंटरनॅशनलचे स्पष्टीकरण, लिस्टमधील नावं टारगेट असल्याचं म्हटलेच नव्हते, जगभरातील माध्यमांनी रंगवल्या कहाण्या । Pegasus Controversy amnesty international statement pegasus spyware list target politicians

    Pegasus Controversy : अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलची मोठी कबुली… त्या लिस्टमधील नावं टारगेट नव्हती! माध्यमांनी रंगवल्या कहाण्या..

    Pegasus Controversy : पेगॅसस हेरगिरी प्रकरणातील सध्या सुरू असलेल्या वादादरम्यान आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्था अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलचा (Amnesty International) खुलासा समोर आला आहे. अ‍ॅम्नेस्टीने एका निवेदनात म्हटले आहे की, नुकतीच जाहीर केलेली यादी एनएसओ ग्रुपच्या पेगॅसस स्पायवेअरने लक्ष्य केल्याचे आम्ही कधीही म्हटलेले नाही. Pegasus Controversy amnesty international statement pegasus spyware list target politicians


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पेगॅसस हेरगिरी प्रकरणातील सध्या सुरू असलेल्या वादादरम्यान आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्था अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलचा (Amnesty International) खुलासा समोर आला आहे. अ‍ॅम्नेस्टीने एका निवेदनात म्हटले आहे की, नुकतीच जाहीर केलेली यादी एनएसओ ग्रुपच्या पेगॅसस स्पायवेअरने लक्ष्य केल्याचे आम्ही कधीही म्हटलेले नाही.

    कंपनीने निवेदनात म्हटले आहे की, जी यादी बाहेर पडली आहे ते टारगेट नव्हते परंतु संभाव्य टारगेट असू शकल असते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ‘अ‍ॅम्नेस्टीने स्पष्ट केले आहे की ज्या याद्या आल्या आहेत त्या संभाव्य टारगेट आहेत, म्हणजेच एनएसओ ग्रुपचे सॉफ्टवेअर वापरले जाऊ शकतात.

    अ‍ॅम्नेस्टीने म्हटले की, संपूर्ण यादीमध्ये काही मोजकेच लोक होते ज्यांचे परीक्षण केले गेले, परंतु उर्वरित लोकांसाठी हे कन्फर्म केले जाऊ शकत नाही.

    नुकताच अनेक आंतरराष्ट्रीय मीडिया कंपन्या, फोर्बिडन स्टोरी आणि अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल या संस्थेने जगातील जवळपास 50 हजार फोन हॅक केल्याचा दावा केला होता. यामध्ये पत्रकार, राजकारणी, मंत्री, कार्यकर्ते यांचा समावेश होता. इस्रायली कंपनी एनएसओ ग्रुपचे पेगॅसस सॉफ्टवेअर फोन हॅकिंगसाठी वापरले गेले.

    यानंतर भारतात मोठी खळबळ उडाली आहे, विरोधी पक्ष हा विषय संसदेपासून ते रस्त्यापर्यंत उपस्थित करत आहेत. या संपूर्ण यादीत जवळपास तीनशे लोक भारताचे होते, ज्यात राहुल गांधी, प्रशांत किशोर, चाळीसहून अधिक पत्रकार, मंत्री आणि इतर सेलिब्रिटींसह अनेक विरोधी नेत्यांना लक्ष्य केले होते.

    अहवालात केलेल्या दाव्यावर एनएसओ समूहाने आधीपासूनच स्पष्टीकरण दिले होते की, हे सॉफ्टवेअर खासगी संस्थांना नाही, तर केवळ सरकारांना विकले जाते. एनएसओ समूहाने या दाव्यांचे खंडन केले होते. फ्रान्स, इस्रायलमध्ये आता या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

    Pegasus Controversy amnesty international statement pegasus spyware list target politicians

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!