शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि माजी आमदार विवेक पाटील यांना कर्नाळा बॅँक घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)अटक केली आहे. राहत्या घरातूनच त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. Peasent and workers party leader, former MLA Vivek Patil arrested in Karnala Bank scam
विशेष प्रतिनिधी
मुंबई : शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि माजी आमदार विवेक पाटील यांना कर्नाळा बॅँक घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)अटक केली आहे. राहत्या घरातूनच त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
कनार्ळा बँक घोटाळ्यात आमदार विवेक पाटील हे मुख्य आरोपी आहेत. विवेक पाटील यांच्यासह ७६ जणांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. कनार्ळा बँकेचे कोट्यवधी रुपयांचे घोटाळा प्रकरण राज्यभर गाजला होता. या बँकेचे लाखो ठेवीदार ठेवी परत मिळाव्यात यासाठी प्रयत्न करीत होते.
१०० कोटींपेक्षा अधिकचा घोटाळा असल्याने ईडीने यामध्ये हस्तक्षेप करत तपास सुरू केला होता. त्यात, चौकशी सुरू असताना मुंबई ईडी झोन-२ चे सहाय्यक संचालक सुनील कुमार यांनी पाटील यांना अटक केली आली आहे.
महाविकास आघाडी सरकार विवेक पाटील यांना कारवाई पासुन वाचवत असल्याचा आरोप करण्यात येत होता.आमदार प्रशांत ठाकुर यांच्यासह आमदार महेश बालदी हे विवेक पाटील यांच्यावर कारवाईसाठी प्रयत्नशील होते. त्यांनी ठेवीदारांना घेऊन मोर्चे देखील काढले होते.
कनार्ळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बँकेच्या नियमांचे उल्लंघन करून कागदपत्रांमध्ये फेरफार करून बनावट कागदपत्रे तयार केली. त्याचा कर्ज प्रकरणात वापर करून बँकेचे सभासद, ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवींचा ५१२ कोटी ५४ लाख ५३ हजार २८६ रुपयांचा अपहार केला.
त्यामुळे बँकेची आर्थिक स्थिती डबघाईस आली. म्हणून सहकारी संस्था अलिबाग येथील जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-१ चे उमेश गोपीनाथ तुपे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार ७६ जणांविरोधात १७ फेब्रुवारी रोजी रात्री पनवेल शहर पोलीस ठाण्यात फेब्रुवारी २०२० मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Peasent and workers party leader, former MLA Vivek Patil arrested in Karnala Bank scam
महत्त्वाच्या बातम्या
- चीनविरुद्धच्या संघर्षात धारातीर्थी पडलेले हुतात्मा संतोष बाबूंचा सूर्यापेटमध्ये पुतळा
- बांगलादेशने भारतासमवेतच्या सीमाबंदीत केली ३० जूनपर्यंत वाढ
- पाकिस्तान ठरतोय गाढवांचा देश, चीनमुळे संख्येत विक्रमी वाढ
- TEAM INDIA WTC FINAL : भारतीय संघाची घोषणा ; रोहितसोबत युवा शुबमन गिलला सलामीला संधीश; विजेत्याला 12 कोटी
- संभाजीराजे यांच्यासमवेत आंदोलनात सहभागी होणाऱ्या प्रकाश आंबेडकरांचा राजकीय होरा काय…??