विशेष प्रतिनिधी
गुवाहाटी : आसाममध्ये नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ बोडोलॅंड (एनएलएफबी) या दहशतवादी संघटनेच्या सर्व दहशतवाद्यांनी आज शरणागती पत्करली. त्यामुळे, आसामच्या बोडोलॅंड प्रादेशिक क्षेत्रात (बीटीआर) शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.Peace will come back in Bodoland
उडालगुरी जिल्ह्यातील लालपाणी येथे ‘एनएलएफबी’चा प्रमुख एम. बाठासह २० दहशतवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवली.सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना गुवाहाटीला नेले जाईल. दहशतवादी जंगलातील रस्त्यावरील चालत येतानाचा व्हिडिओ मुख्यमंत्री सरमा यांनी ट्विटरवर शेअर केला.
‘एनएलएफबी’चे दहशतवादी स्वगृही परतत आहेत. त्यामुळे, बोडोलॅंडमध्ये शांततेची नवीन पहाट उगवली आहे.शांततामय आसामकडे टाकलेले हे मोठे पाऊल आहे,’ असे ट्विट त्यांनी केले.
‘एनएलएफबी’ प्रामुख्याने बोडोलॅंडमध्ये सक्रिय होती. पूर्वीच्या नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलॅंड (एनडीएफबी)च्या असंतुष्ट दहशतवाद्यांनी या नव्या दहशतवादी संघटनेची स्थापना केली होती.काही महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या ‘एनएलएफबी’चा एक दहशतवादी पोलिस चकमकीत ठार झाला होता. इतर २७ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती.
Peace will come back in Bodoland
महत्त्वाच्या बातम्या
- जर्मनीतील पूर ओसरला, युरोपमधील पूरबळींची संख्या पोहोचली दोनशेच्या वर
- राज्याला ड्रायव्हर नकोय, जनतेचे हित जपणारा चांगला मुख्यमंत्री हवा आहे, नारायण राणे यांची टीका
- राहूल गांधी यांच्या टीकेवर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांचे इटालियन भाषेत उत्तर, म्हणाले या राजकुमाराकडे तेव्हाही मेंदू नव्हता आणि नेहमीच नसेल
- उत्तर प्रदेशात जीन्सच्या हट्टामुळे आजोबाची नातीला मारहाण; मुलीचा करुण अंत
- कोरोनामुळे जगभरात १५ लाख बालकांनी पालकांना गमावले, भारतातही अनाथ होण्याचे प्रमाण मोठे