प्रतिनिधी
पुणे – अफगाणिस्तानात तालिबान राजवट आल्याबरोबर जम्मू – काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना सुरसुरी आली आहे. त्यांनी याच मोठ्या आढ्यताखोरीतून केंद्रातल्या मोदी सरकारलाच धमकी दिली आहे. काश्मीरींना छोटे समजू नका. मुंगी हत्तीच्या सोंडेत शिरली की हत्तीलाही भारी ठरते, अशा शब्दांत त्यांनी मोदींना धमकावले. PDP chief Mehbooba Mufti dares PM Narendra Modi to behave himself on jammu and kashmir
अफगाणिस्तानात पाहा अमेरिकेला कसा गाशा गुंडाळू न जावे लागले. तुम्ही आम्हाला कमी समजू नका. तुम्ही काश्मीरी जनतेशी लवकरात लवकर बोला, असे मेहबूबांनी एका जाहीर कार्यक्रमात बोलताना सांगितले. त्यांनी मोदी सरकारला थेट धमकी दिली आहे. शेजारील देशात पाहा कशाप्रकारे शक्तीशाली अमेरिकेला आपलं सामान बांधून परत जावं लागलं, असंही त्या म्हणाल्या आहेत. तसेच, जम्मू-काश्मीरवर चर्चा नाही केली तर फार उशीर होईल. असा इशारा त्यांनी दिलेला आहे.
मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या की, मी वारंवार सांगत आहे की आमची परीक्षा घेऊ नका? सुधारा, सांभाळा शेजारी काय होतेय ते पाहा. एवढी मोठी शक्ती अमेरिका त्यांना देखील तिथून सामान बांधून परत जावे लागले. तुम्हाला अजूनही संधी आहे.
ज्याप्रकारे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी जम्मू-काश्मीरमध्ये चर्चा सुरू केली होती, त्याचप्रमाणे तुम्ही देखील जम्मू-काश्मीरमध्ये चर्चा सुरू करा आणि जे तुम्ही लुटले आहे. बेकायदेशीरपणे, जे जम्मू-काश्मीरचे चित्र तुम्ही खराब केले आहे. जम्मू-काश्मीरचे तुकडे तुकडे केलेत. ही चूक सुधारा अन्यथा फार उशीर होईल, अशा शब्दांमध्ये मेहबूबा मुफ्तींनी मोदी सरकारला धमकी दिली.
PDP chief Mehbooba Mufti dares PM Narendra Modi to behave himself on jammu and kashmir
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबादमध्ये भाजप-मनसेची युती ? विश्राम गृहावर नियोजित बैठक नियोजित , महत्त्वाच्या बैठकीकडे राज्याचं लक्ष!
- अखिलेश यादवांच्या समाजवादी पक्षाचे ब्राह्मण लांगूलचालन, पण कोणती विकास योजना आणून नव्हे, तर परशुरामाचे पुतळे उभारून!!
- अमोल मिटकरींना तोंडाच्या गटारावर आमदारकी,मंत्रालयात जाताना गाडीच्या काचा काळ्या करा, अन्यथा गाडीत दिसल्यास मिटकरींना फोडू, मनसेनी दिली धमकी