• Download App
    खेळाडूंची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी पीसीबीचा अजब फॉर्म्युला; पाक क्रिकेटपटूंना कठोर लष्करी प्रशिक्षण, डोंगर चढायला लावले, 3 जखमी|PCB's strange formula to increase players' strength; Pak cricketers subjected to rigorous military training, made to climb mountains, 3 injured

    खेळाडूंची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी पीसीबीचा अजब फॉर्म्युला; पाक क्रिकेटपटूंना कठोर लष्करी प्रशिक्षण, डोंगर चढायला लावले, 3 जखमी

    वृत्तसंस्था

    इस्लामाबाद : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी सुपर लीगदरम्यान लांब षटकार न मारल्याबद्दल खेळाडूंना चांगलेच खडसावले. ड्रेसिंग रूममध्ये त्यांनी खेळाडूंना सांगितले की, ‘मी तुमचा फिटनेस सुधारेन.’ यानंतर सुपर लीग संपताच नक्वी यांनी पाकिस्तानी क्रिकेटपटूंना 14 दिवसांच्या प्रशिक्षणासाठी काकुल येथील पाक मिलिटरी अकादमीत पाठवले.PCB’s strange formula to increase players’ strength; Pak cricketers subjected to rigorous military training, made to climb mountains, 3 injured

    येथील कठोर प्रशिक्षणात डोंगर चढणे आणि दगड उचलणे यांचा समावेश होता. या लष्करी प्रशिक्षणामुळे पाकिस्तानचे स्टार फलंदाज मोहंमद रिझवान, आझम खान आणि इरफान नियाझी जखमी झाले आहेत. या तिघांनाही न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेतून बाहेर बसावे लागले. आता 2 जूनपासून होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी पाकिस्तान आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध मालिका खेळेल की नाही, याबाबतही प्रश्न उपस्थित झाला आहे.



    आझम खानच्या ट्रेनिंग व्हिडिओवर जोक

    ओव्हरवेट खेळाडू आझम खानच्या ट्रेनिंग व्हिडिओवर सोशल मीडियावर अनेक जोक्स बनवले गेले. एका माजी खेळाडूने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, बोर्डाचे अध्यक्ष नक्वी सैनिक आणि खेळाडू यातील फरक विसरले आहेत. शारीरिक तंदुरुस्तीसोबतच खेळाडूला मानसिक बळाचीही गरज असते, जी लष्करी प्रशिक्षणातून मिळत नाही.

    क्रिकेटपटूंना एकमेकांच्या पाठीवर घेऊन धावायला लावले

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्करी प्रशिक्षणादरम्यान क्रिकेटपटूंना एकमेकांच्या पाठीवर बसवून धावणे, आर्मी फिजिकल हर्डल, बर्मा ब्रिज आणि काकुलच्या टेकड्यांमध्ये रोप क्लायंबिंग करण्यात आले. खेळाडूंसाठी एकमेकांना पाठीवर घेऊन धावणे ही सर्वात कठीण कसरत होती. रणांगणात सैनिक आपल्या जखमी साथीदाराला पाठीवर घेऊन जातो, तसे हे होते. यात अनेक खेळाडूंना दम लागला होता.

    PCB’s strange formula to increase players’ strength; Pak cricketers subjected to rigorous military training, made to climb mountains, 3 injured

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य