• Download App
    पवारांचा पॅलेस्टिनींना पाठिंबा; पवार आता सुप्रियांनाच हमासच्या बाजूने लढायला पाठवतील; आसामच्या मुख्यमंत्र्यांचा टोला!! Pawar's support for Palestinians

    पवारांचा पॅलेस्टिनींना पाठिंबा; पवार आता सुप्रियांनाच हमासच्या बाजूने लढायला पाठवतील; आसामच्या मुख्यमंत्र्यांचा टोला!!

    वृत्तसंस्था

    गुवाहाटी : इस्रायलने हमास दहशतवादी संघटनेच्या विरोधात पुकारलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पॅलेस्टिनींचे समर्थन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलला पाठिंबा देणे चूक आहे कारण इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारख्या पंतप्रधानांनी पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला होता, असे वक्तव्य पवारांनी केले होते.Pawar’s support for Palestinians; Pawar will now send only Supriya to fight on the side of Hamas; Assam Chief Minister’s entourage

    पवारांच्या या वक्तव्यावर भाजप नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल आदींनी पवारांवर शरसंधान साधले आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणावर पवारांसाठी ज्येष्ठ नेत्याने इतकी उथळ टिपण्णी करणे अयोग्य असल्याचे नितीन गडकरींनी ट्विटमध्ये म्हटले आहे, तर पियुष गोयल यांनी पवारांना भारत इस्रायल संबंध पी. व्ही. नरसिंह राव यांच्या काळात प्रस्थापित झाले आणि सुधारले याची आठवण करून दिली आहे. त्या काळात पवार नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री होते.



    पण त्यापलीकडे जाऊन आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी पवारांचा जोरदार समाचार घेतला आहे. आता पवार बहुतेक सुप्रिया सुळेंनाच हमासच्या बाजूने लढायला गाझा पट्टीत पाठवतील, असा टोला हेमंत विश्वशर्मा यांनी हाणला आहे.

    काही दिवसांपूर्वी याच हेमंत विश्वशर्मांची सुप्रिया सुळे यांनी वेगळ्या संदर्भात स्तुती केली होती. भाजपकडे चांगले शासन आणि प्रशासन चालवायला माणसे नाहीत. त्यामुळे ते बाकीच्या पक्षांमधून माणसे उचलून नेतात, असे सांगताना त्यांनी सुप्रिया सुळे यांनी हेमंत विश्वशर्मा यांचेच उदाहरण दिले होते. हेमंत विश्वशर्मांना भाजपने काँग्रेस मधून आपल्याकडे घेतले आणि त्यांना आसामचे मुख्यमंत्री केले म्हणजे त्यांना ते करावे लागले. कारण भाजपकडे चांगला नेताच नव्हता, असा टोला त्यांनी भाजपला लगावला होता, पण आज त्याच हेमंत विश्वशर्मांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना पॅलेस्टिनी समर्थनाबद्दल टोला हाणला आहे.

    Pawar’s support for Palestinians; Pawar will now send only Supriya to fight on the side of Hamas; Assam Chief Minister’s entourage

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Fatah-2′ missile : चीनने पाकिस्तानला दिलेले ‘फतह-२’ क्षेपणास्त्र भारताने पाडले

    Indian Army : भारतीय लष्कराने जारी केला एक व्हिडिओ अन् पाकिस्तानच्या खोटेपणचा बुरखा फाटला

    Operation sindoor : अणुबॉम्ब टाकायचाय की युद्ध नकोय??, पाकिस्तानातल्या नेत्यांमध्येच गोंधळ; त्यात विमानतळ आणि लष्करी तळांच्या नुकसानीची भर!!