• Download App
    पवारांना उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून घालवायचेय, संजय राऊतांचे पवारांच्या अजेंड्यावरच काम : चंद्रकांतदादा पाटील |Pawar wants to remove Uddhav Thackeray from CM post, Sanjay Raut's work on Pawar's agenda only: Chandrakantdada Patil

    पवारांना उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून घालवायचेय, संजय राऊतांचे पवारांच्या अजेंड्यावरच काम – चंद्रकांतदादा पाटील

    प्रतिनिधी

    पुणे : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत विरुद्ध भाजपचे नेते असा कलगीतुरा रंगला असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी वेगळे राजकीय रहस्य बाहेर आणले आहे.Pawar wants to remove Uddhav Thackeray from CM post, Sanjay Raut’s work on Pawar’s agenda only: Chandrakantdada Patil

    संजय राऊत हे शरद पवारांच्या अजेंड्यावर काम करत आहेत. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना 2.5 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे आता शरद पवारांना उद्धव ठाकरे यांना घरी बसवायचे आहे. पण उद्धव ठाकरेंना घालवून ते थेट खासदार सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करू शकत नाहीत. म्हणून मध्ये संजय राऊत यांना त्यांना मुख्यमंत्रीपदी बसवायचे आहे,



    असा दावा चंद्रकांत दादा पाटील यांनी केला आहे. सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदी बसल्या काय किंवा संजय राऊत बसले काय पवारांच्या दृष्टीने आपल्या हातात राज्य आले, असे त्यांना वाटते. त्यामुळे संजय राऊत हे शरद पवारांच्या अजेड्यांवर काम करत आहेत, असा टोला चंद्रकांत दादा पाटील यांनी लगावला आहे.

    संजय राऊत यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर अतिशय खालच्या शब्दात टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांनी मी कोल्हापूर जिल्ह्यातल्या गावचा पाटील आहे. मी संजय राऊत यांच्या पेक्षा घाणेरडा बोलू शकतो. पण माझी ती संस्कृती नाही, असा टोलाही हाणला आहे.

    Pawar wants to remove Uddhav Thackeray from CM post, Sanjay Raut’s work on Pawar’s agenda only: Chandrakantdada Patil

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi भारतात नेहरुंचे री ब्रँडिंग करून राहुल गांधी अमेरिकेत; सॅम पित्रोदांकडून जोरदार स्वागत!!

    Malegaon : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल न्यायालयाने ठेवला राखून

    Murshidabad : मुर्शिदाबाद हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवर उद्या होणार सुनावणी