विशेष प्रतिनिधी
मुंबई : सावरकर मुद्द्यावर राहुल गांधी आणि काँग्रेस यांना बॅकफूटवर ढकलण्यात यशस्वी ठरलेल्या शरद पवारांनी पुढचा बॉल टाकत राहुल गांधींची विकेट काढण्यासाठी अदानींची बाजू उचलून धरली, पण मधल्या मध्ये उच्चशिक्षित पदवीधर लिबरल पत्रकार कम विचारवंतांची राजकीय विकेट गेली!! अशी स्थिती झाली आहे. Sharad Pawar backs adani; liberal journalists hits out at pawar
कारण सावरकर मुद्द्यावर जरी राहुल गांधी बॅकफूटवर गेले असले, तरी अदानी मुद्द्यावर मात्र पवारांच्या एनडीटीव्ही मुलाखतीनंतरही ते बॅकफूटवर गेले नाहीत, उलट त्यांनी अधिक आक्रमकपणे अदानींचा मुद्दा लावून धरला आहे. पण मधल्या मध्ये लिबरल पत्रकार कम विचारवंतांची मात्र पवारांच्या भूमिकेमुळे पुरती गोची झाली आहे.
निखिल वागळे, राजू परूळेकर, धवल कुलकर्णी, विश्वंभर चौधरी या महाराष्ट्रातील लिबरल पत्रकार कम विचारवंतांच्या सोशल मीडिया पोस्ट पाहिल्या की हे लक्षात येते. महाराष्ट्रात शिवसेना – भाजप महायुतीला मिळालेला कौल टाळून उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांबरोबर जाऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले, तेव्हा भाजपला सत्ते बाहेर ठेवल्याचा केवढा आनंद या उच्चशिक्षित पदवीधर लिबरल पत्रकार कम विचारवंतांना झाला होता!! उद्धव ठाकरेंमध्ये त्यांना फार मोठ्ठे किंबहुना उत्तुंग मुख्यमंत्र्यांचे नेतृत्व आढळले होते!! हे “उत्तुंग” नेतृत्व अडीच वर्षात कोसळले आणि सत्तेबाहेर गेले. त्यामुळे या त्यामुळे उद्धव ठाकरेंबरोबरच्या शिवसैनिकांना जेवढे दुःख झाले नसेल तेवढे मोठ्ठे दुःख या लिबरल पत्रकार कम विचारवंतांना झाले होते आणि आता तर त्यापुढे जाऊन जेव्हा शरद पवारांनी अदानी मुद्द्यावर मोदी सरकारला अनुकूल ठरणारी भूमिका घेतल्यानंतर तर या लिबरल पत्रकार कम विचारवंतांच्या पायाखालची राजकीय वैचारिक वाळूच सरकली आहे!!
निखिल वागळे, परूळेकर, धवल कुलकर्णी, विश्वंभर चौधरी आदींना शरद पवारांची राजकीय विश्वासार्हता कशी ढळलेली आहे हे आता नव्याने उमगले आहे. निखिल वागळे यांनी जोपर्यंत शरद पवारांसारखे संधीसाधू राजकारणात आहे, तोपर्यंत मोदींचा पराभव करता येणे अशक्य आहे, असे ट्विट करून आपला वैचारिक पराभव मान्य केला आहे. पण त्यांनी ते एकमेव ट्विट केलेले नाही त्यांनी अशी अनेक ट्विट करून ज्याला सर्वसामान्य भाषेत आज आदळआपट म्हणता येईल ते केले आहे!!
जे निखिल वागळे यांचे तेच धवल कुलकर्णी, राजू परुळेकर आणि विश्वंभर चौधरी यांचे आहे. त्यांना देखील पवारांनी अदानींची बाजू उचलून धरल्यानंतर प्रचंड राग आला आहे. अर्थात तो राग त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर “उच्चशिक्षित बौद्धिक कंटेंट” टाकून व्यक्त केला आहे. हे सर्व उच्चशिक्षित पदवीधर लिबरल पत्रकार कम विचारवंत आहेत. त्यामुळे अर्थातच ते “हिंसक” नाहीत. त्यामुळेच त्यांचा जो काही राग आहे, तो शिवसैनिकांसारखा रस्त्यावर खळ्ळ खट्याक सारखा व्यक्त न होता सोशल मीडियावर “उच्चशिक्षित बौद्धिक कंटेंट”द्वारे झाला आहे!!
शरद पवारांचा त्यांना राग आला आहे आणि म्हणूनच त्यांनी शरद पवारांच्या राजकीय विश्वासार्हतेवर प्रचंड मोठे ठळक प्रश्नचिन्ह लावले आहे. जणू काही पवारांनी आज अदानींची बाजू घेतली नसती, तर गेल्या त्यांच्या 50 – 55 वर्षांच्या राजकीय इतिहासातली सर्व कारकीर्द प्रचंड विश्वासार्हतेनेच भरलेली आहे, असे त्यांचे म्हणणे दिसते!!
शरद पवारांनी भाजपला भाजप – शिवसेना महायुतीला जनतेने दिलेला कौल नाकारून महाविकास आघाडी बनवली, हे या लिबरल पत्रकार कम विचारवंतांना चालले. तेव्हा त्यांची पवारांची विश्वासार्हता ढासळल्याचे त्यांना दिसले नव्हते. पण पवारांनी अदानी मुद्द्यावर मोदींना अनुकूल भूमिका घेताच पवारांची विश्वासार्हता ढासळल्याचा “नवा साक्षात्कार” या लिबरल पत्रकार कम विचारवंतांना झाला आहे. हे त्यांच्या मोदी विरोधाचे खरे “उच्चशिक्षित पदवीधर” राजकीय वैशिष्ट्य आहे!!
Sharad Pawar backs adani; liberal journalists hits out at pawar
महत्वाच्या बातम्या
- आज PM मोदी एकाच वेळी करणार दोन वंदे भारताचे लोकार्पण, या राज्यांतील प्रवाशांना मिळणार लाभ
- अदानींच्या समर्थनाचे पवारांचे वक्तव्य, काँग्रेस हायकमांडला टोचून महाराष्ट्रातल्याच महाविकास आघाडीला सुरुंग!!
- सावरकर मुद्द्यावर बॅकफूटवर ढकलेले काँग्रेस नेतृत्व अदानी मुद्द्यावर पवारांच्या मुलाखतीच्या डावपेची राजकारणापुढे झुकेल??
- नऊ वर्षांत तब्बल २३ दिग्गज नेत्यांनी काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी; प्रत्येकाचं कारण मात्र एकच ते म्हणजे…